बोलबच्चन भैरवी असलेल्यांना उत्तर देत नाही; देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंना टोला

Devendra Fadnavis | मुंबईत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वर्धापनदिनी आयोजित मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. कम ऑन किल मी…हिंमत असेल तर अंगावर या…पण अंगावर येणार असाल तर एक गोष्ट नक्की करा, अमिताभच्या चित्रपटात तो अॅम्बुलन्स घेऊन येतो तशी अॅम्बुलन्स घेऊनच या. कारण तुम्ही पायावर चालत जाणार नाही, तर जाताना आडवे होऊन स्ट्रेचरवर जाल, असं उद्धव ठाकरे म्हणाले. ठाकरेंच्या या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोचक शैलीत प्रतिक्रिया दिली.
जळगाव दौऱ्यावर असताना माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, “बोलबच्चन भैरवींना मी उत्तर देत नाही.” त्यांच्या या टोल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. फडणवीस यांनी ठाकरेंच्या वक्तव्याला गंभीरपणे न घेता त्यांना ‘बोलबच्चन’ संबोधून त्यांच्या टीकेची धार कमी करण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा : पुण्यात राहणारे एक इराणी शरणार्थी बेहज़ाद अमीरी यांचे स्वप्न… “एक दिवस माझा मातृदेश लोकशाही राष्ट्र होईल”
भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात आदिवासी समाजाचे मोठे योगदान राहिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व आदिवासी स्वातंत्र्य सेनानींचा गौरव झाला पाहिजे, यासाठी वेगवेगळे कार्यक्रम काही वर्षांपासून हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून क्रांतिकारी नाईक यांच्या स्मारकाच्या भूमिपूजनासाठी यापूर्वी धरणगावात आलो होतो. आता स्मारकाच्या उद्घाटनाची संधीही मिळाली, असे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.





