Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘दारव्हा शहराच्या विकासाचा संकल्प’; पालकमंत्री संजय राठोड

यवतमाळ : दारव्हा शहरातील नवनिर्मित वंदनीय बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल, बचत भवन आणि उच्च प्राथमिक शाळा इमारतीचे लोकार्पण तसेच छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमचे भूमिपूजन पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. यावेळी दारव्हा शहराच्या विकासाचा संकल्प केला असून त्यासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे पालकमंत्री राठोड यांनी सांगितले.

या लोकार्पण व भूमिपूजन सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम नवनिर्मित क्रीडा संकुल येथे मोठ्या पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून खासदार संजय देशमुख, जिल्हाधिकारी विकास मीना, उपविभागीय अधिकारी विजय सुर्यवंशी, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर भोरे, तहसीलदार राजेंद्र पौळ, मुख्याधिकारी विठ्ठल केदारे, नगराध्यक्ष सुनील चिरडे, नगरपरिषदेचे सभापती, नगरसेवक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री राठोड म्हणाले की, आमचा अजेंडा विकासाचा असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या नेतृत्वात राज्य प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. जिल्ह्यात चांगल्या सुविधा निर्माण करण्याचे काम सुरु आहे. मतदारसंघांचा विकासही केला जात आहे. आज बचत भवन, शाळा, क्रीडा संकुलची निर्मिती आणि दारव्हा शहराच्या वैभवात भर पडेल अशा छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमची निर्माण करण्यात येईल. दारव्ह्यातील विकासकामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे.

हेही वाचा –  थलपती विजय यांच्या मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यातील अवघ्या 18 सेकंदाच्या व्हायरल व्हिडिओची जोरदार चर्चा

ज्येष्ठ नागरिकांसाठी वृद्धाश्रम उभारण्यात येईल. दारव्हा शहरातील व्यापार वाढविण्यासाठी व्यापारी गाळे उभारण्यात येणार आहे. दारव्हा उपजिल्हा रुग्णालयाचा कायापालट करण्याचा प्रयत्न आहे. दर्जेदार शाळा निर्मिती, छोट्या व्यापाऱ्यांसाठी अल्पदरातील गाळे उपलब्ध केले जाणार आहे. बचत गटासाठी मोठा उद्योग आणाण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहे. दारव्हा शहरातील विविध विकासकामांमुळे शहराचा कायापालट होत असल्साचे पालकमंत्री राठोड यांनी यावेळी सांगितले. तसेच बचत भवन, शाळा आणि क्रीडा संकुलातील सुविधांचा चागल्यारितीने वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी खासदार संजय देशमुख म्हणाले, दारव्ह्यातील नवनिर्मित शासकीय वास्तू दिशा दर्शक आहेत. पोलीस स्टेशन, बचत भवन, नगरपरिषद मराठी शाळेची चांगली निर्मिती झाली आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल हा युवा खेळाडूंना प्रेरणा देणारा मॉडेल प्रकल्प आहे. अशा सुविधा संपूर्ण जिल्ह्यात सुरु कराव्यात, अशी सूचना करुन वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे, शंकुतला ब्रॅाडगेज रेल्वेबाबत माहिती दिली.

जिल्हाधिकारी विकास मीना यांनी जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रातील विकास कामांची माहिती दिली. यावेळी नगराध्यक्ष सुनील चिरडे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकात मुख्याधिकारी विठ्ठल केदारे यांनी दारव्ह्यातील विकासकामांची माहिती दिली.दारव्हा येथे दोन वर्षांपूर्वी सुरु करण्यात आलेल्या नवीन अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षेची तयार करुन शासकीय सेवेत निवड झालेल्या २२ युवक-युवतींचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button