Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

माण-हिंजवडी ते शिवाजीनगर-पुणे मेट्रो मार्ग ३ च्या कामाचा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतला आढावा

२४ तास बांधकामांना परवानगी देण्याचे पोलिसांना निर्देश

पुणे | माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो-३ मार्गाच्या कामाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आढावा घेतला. या कामाला गती मिळावी, यासाठी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी चोवीस तास गर्डर टाकण्याचे काम व बांधकामाला परवानगी द्यावी, असे निर्देश त्यांनी पोलिसांना दिले. या मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाच्या खालील रस्ते सुव्यवस्थित ठेवण्याची काळजी घ्यावी, असे देखील यावेळी अजित पवार यांनी नमूद केले.

हेही वाचा   –      मविआचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? शरद पवारांनी दिलं उत्तर; म्हणाले.. 

मेट्रोच्या कामामुळे रस्ते किंवा ड्रेनेज लाईन खराब झाल्यास ती तातडीने दुरुस्त करावीत, असे अजित पवार यावेळी म्हणाले. गरज भासल्यास नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा सल्ला त्यांनी दिला. सध्या सुरू असलेल्या मेट्रोच्या कामासह रस्त्यांची दुरवस्था झाल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. ही कामे वेळेत न झाल्यास संबंधित कंपनीवर कारवाई करण्यात येईल, असे अजित पवार यांनी सांगितले. मेट्रोच्या कामाला गती देण्यावर अजित पवार यांनी भर दिला, ज्याचा फायदा नागरिकांना होणार आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button