‘सकाळी नऊचा भेंगा बंद करा, अन्यथा..’; संजय राऊतांनाही जीवे मारण्याची धमकी!
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि त्यांचे बंधू सुनील राऊत यांनाही जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. एकाच दिवशी दोन विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तर महाविकास आघाडीतीने नते आता चांगलाच आक्रमक झाला आहेत.
खासदार संजय राऊत यांना ८ जून रोजी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास धमकी आली. ही धमकी सुनील राऊत यांच्या फोनवर आली. फोन करणारा व्यक्ती हिंदीत बोलत होता. त्याने संजय राऊत यांना सकाळी नऊचा भेंगा बंद करायला सांगा, त्यासाठी एका महिन्याची मुदत देतो. अन्यथा त्यांना गोळ्या मारू, अशी धमकी दिली आहे. महिन्याभरात दोन्ही भावांना गोळी मारून स्मशानात पोहचवणार असल्याचं म्हटलं आहे.
हेही वाचा – ‘तुझा लवकरच दाभोलकर हेणार..’, शरद पवारांना ट्विटवरून जीवे मारण्याची धमकी!
खासदार संजय राऊत आणि सुनील राऊत यांना धमकी प्रकरणी आता पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच यासंदर्भातील ऑडियो क्लिप मुंबई पोलिसांना दिली आहे.
शरद पवार यांना देखील जीवे मराण्याची धमकी!
एका सोशल मीडिया अकाऊंटवरून शरद पवार यांना ही धमकी देण्यात आली आहे. ‘शरद पवार तुझा लवकरच दाभेलकर हेणार..’ अशी पोस्ट अकाऊंटवर करण्यात आली आहे. तसेच, या धमकीबरोबरच शरद पवार यांना अश्लाघ्य भाषेत शिवीगाळ करण्यात आली आहे. यासंदर्भात गृहविभागानं लक्ष घालण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी यावेली दिली आहे.