breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारणविदर्भ

नागपूरमधील रेड लाइट एरियात जमावबंदीचे आदेश; शेकडो पोलीस तैनात

मुंबई |

उपराजधानीतील देहव्यापारासाठी (कु)प्रसिद्ध असणाऱ्या गंगा जमुनात बुधवारी रात्री पोलिसांनी संचारबंदी (सील) लागू केली असून प्रचंड पोलिस बंदोबस्तात पोलिसांनी या परिसराची झाडाझडती सुरू केली आहे. गंगा जमुनात करोना नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. या भागात गुन्हेगारांचा वावर असून, काही दलाल अल्पवयीन मुलींकडून बळजबरीने देहव्यापार करवून घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

याशिवाय परिसरातील नगरसेवक व प्रतिष्ठीत नागरिकांनीही गंगा जमनामुळे होणाऱ्या त्रासाबाबत पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली. याची दखल घेत पोलीस आयुक्तांनी बुधवारी रात्री गंगा जमुना सिल करून या भागात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला. याबाबतची अधिसूचनाही काढण्यात आली. यासह लकडगंज पोलिसांच्या पाच अधिकारी व १०० पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रचंड ताफा या भागात तैनात करण्यात आला आहे. बुधवारी रात्री पोलिसांनी गंगा जमुना परिसराची झाडाझडती सुरू केली.

  • दारू दुकानांचे परवाने रद्द करणार

गंगा जमुना परिसरात देशी दारू, बीअर शॉपी, वाइन शॉपसह एक बीअर शॉपही आहे. या सर्वांचे परवाने रद्द करण्याचे पत्र आयुक्तांनी उत्पादन शुल्क विभागाला पाठविले आहेत. आता उत्पादन शुल्क विभाग आयुक्तांच्या पत्रावर काय कारवाई करते याकडे लक्ष लागले आहे. तसेच परिसरातील घरांमध्ये देहव्यापारासाठी अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. हे बांधकाम तोडण्याची विनंती अमितेश कुमार यांनी महापौर दयाशंकर तिवारी यांना केली असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button