Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘छत्रपती संभाजीनगर येथे प्रशस्त सहकार संकुलाची निर्मिती करा’; राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

मुंबई : छत्रपती संभाजीनगर विभागीय ठिकाण असल्यामुळे सहकार विभागाची अनेक कार्यालये शहरात आहेत. नागरिकांच्या व सहकारी संस्थांच्या सभासदांच्या सोयीसाठी ही संपूर्ण कार्यालये एकाच छताखाली आणणे गरजेचे आहे. त्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे सहकार संकुलाच्या सोईसुविधा युक्त प्रशस्त इमारतीचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करावे, असे निर्देश सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.

बैठकीला अतिरिक्त आयुक्त नागनाथ इगलेवार, छत्रपती संभाजीनगरचे विभागीय सहनिबंधक संतोष बिडवाई, जिल्हा उपनिबंधक समृत जाधव, जागतिक बँक प्रकल्प अंतर्गत कार्यरत कार्यकारी अभियंता प्रिया पुजारी आदी उपस्थित होते.

राज्यमंत्री डॉ. भोयर म्हणाले, सहकार संकुलाची स्थापत्य विषयक कामे पूर्ण करण्यासाठी गती वाढवावी. या इमारतीमध्ये कार्यालयीन कामासाठी आलेल्या नागरिकांना विविध सोयी सवलती असतील, याची खात्री करावी. कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची काम पूर्ण  करण्यात यावी.

हेही वाचा –  ‘भारताला सर्व क्षेत्रात अग्रगण्य राष्ट्र बनवण्याच्या दिशेने वाटचाल’; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल

संबंधित कंत्राटदाराने विहित काल मर्यादित काम पूर्ण करावे. काम पूर्ण करण्यामध्ये विलंब लागल्यास खर्च वाढतो. त्यामुळे यंत्रणेने कंत्राटदाराकडून काम पूर्ण करण्यासाठी दक्षता घ्यावी. कामाला विलंब झाल्यास कंत्राटदारावर नियमानुसार कारवाई करावी, असे निर्देशही राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी दिल्या.

सहकार संकुलामध्ये प्रशासकीय इमारत तळमजला अधिक सात माळ्यांची असून एकूण बांधकाम क्षेत्रफळ 18524 चौरस मीटर आहे. तसेच निवासी इमारतही सात माळ्यांची आहे. संकुलामध्ये पार्किंगची प्रशस्त व्यवस्था, दिव्यांग बांधवांसाठी रॅम्प, चार उद्वाहक, अतिथी गृह, भोजनकक्ष असणार आहे.

या सहकार संकुलात जिल्हा उपनिबंधक, विशेष लेखा परीक्षक वर्ग दोन, सुनावणी हॉल, नोंदणी कक्ष, भांडार कक्ष, कार्यालयीन कर्मचारी कक्ष, विभागीय सहनिबंधक कार्यालय, विशेष लेखापरीक्षक सहकारी संस्था (फिरते पथक), तालुका उपनिबंधक, विशेष लेखापरीक्षक वर्ग दोन (सहकारी संस्था), प्रादेशिक सहसंचालक (साखर), प्रथम विशेष लेखापरीक्षक वर्ग एक (साखर), द्वितीय विशेष लेखापरीक्षक (साखर), विशेष लेखापरीक्षक सहकारी संस्था (बँक), सहकार न्यायालय, विशेष लेखापरीक्षक (दुग्ध), विशेष लेखा परीक्षक (कापूस)आदी कार्यालये तसेच प्रशिक्षण सभागृह आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button