breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेराजकारण

शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीला सुरुवात

Shirur Loksabha Election : मतमोजणीला सकाळी आठ वाजता सुरुवात झाली. शिरूरचा खासदार कोण होणार, हे या मतमोजणीअंती समजणार आहे. 112 टेबलद्वारे मतमोजणी केली जात आहे. महाराष्ट्र औद्योगिक वखार महामंडळाचे गोदाम, रांजणगाव (कारेगाव) येथे ही मतमोजणी होत आहे.

यावर्षी शिरूर लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे डॉ. अमोल कोल्हे आणि अजित पवार गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात दुहेरी लढत पाहायला मिळाली. शरद पवार आणि अजित पवार दोन्ही गटासाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या निवडणुकीसाठी दोन्ही नेत्यांच्या सभा झाल्या.त्याचबरोबर अमोल कोल्हे आणि आढळराव पाटील यांच्यातील वैयक्तिक विधाने देखील चर्चेत राहिली. त्यामुळे मतदार राजा कोणाचे पारडे जड करणार हे मतमोजणी नंतर समजणार आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघाची 112 टेबलद्वारे मतमोजणी केली जात आहे. यामध्ये जुन्नर विधानसभेसाठी 14 टेबलद्वारे 25 फेऱ्या, आंबेगाव विधानसभा मतदार संघासाठी 14 टेबल द्वारे 24 फेऱ्या, खेड-आळंदीसाठी 16 टेबलद्वारे 24 फेऱ्या, शिरूरसाठी 16 टेबलद्वारे 27 फेऱ्या, भोसरीसाठी 20 टेबलद्वारे 23 फेऱ्या, हडपसरसाठी 20 टेबलद्वारे 26 फेऱ्या होणार आहेत. तर पोस्टल आणि ईटीपीबीएस मतमोजणीसाठी 12 टेबल लावण्यात आले आहेत.

शिरूर लोकसभा मतदारसंघात एकूण 32 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. मागील वेळीपेक्षा यंदा शिरूर लोकसभा मतदारसंघात कमी मतदान झाले आहे. यंदा 51.46 टक्के मतदान झाले आहे. सन 2019 मध्ये 59.44 टक्के मतदान झाले होते. तर सन 2014 मध्ये 57.73 टक्के मतदान झाले होते.

एकंदरीत शिरूर लोकसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे प्राबल्य आहे. तरी देखील ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. आज दुपारपर्यंत शिरूरचा खासदार कोण हे स्पष्ट होईल.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button