breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

#CoronaVirus: श्रद्धांजली! पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खासदार वसंतकुमार यांच्या निधनाबद्दल केले दुःख व्यक्त

चेन्नई: काँग्रेसचे कन्याकुमारीचे खासदार एच. वसंत कुमार यांचं कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे निधन झालेलं आहे. त्यांच्यावर 10 ऑगस्टपासून चेन्नईमधील अपोलो रुग्णालयात उपचार सुरु होते. शुक्रवारी (28 ऑगस्ट) रात्री उपचारादरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे. त्यांच्या निधनावर काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राजकीय वर्तुळातील अनेकांनी दुःख व्यक्त केलेलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विट करत खासदार वसंतकुमार यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलेलं आहे. ते म्हणाले, “लोकसभा सदस्य खासदास एच. वसंतकुमार यांच्या निधनाने दुःख झालेलं आहे. त्यांचे व्यवसाय आणि सामाजिक कामातील प्रयत्न देखील हे नोंद घेण्यासारखे आहेत. मी त्यांच्याशी ज्या ज्या वेळी भेटलो त्या त्या वेळी त्यांच्या तामिळनाडूच्या प्रगतीसाठीचे प्रयत्न पाहिलेले आहेत. त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि समर्थकांप्रती सहवेदना. ओम शांती.”

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button