breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण
#CoronaVirus: मुंबईमधील नौदलाच्या मुख्यालयातील आयएनएस आंग्रे या प्रशासकीय तळावरील २१ नाविकांना कोरोनाबाधा
मुंबईमधील नौदलाच्या मुख्यालयातील आयएनएस आंग्रे या प्रशासकीय तळावरील २१ नाविकांना करोनाची बाधा झाली असून नौदलाने या परिसरात टाळेबंदी केली आहे. या सर्व नाविकांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. नौदलातील एका नाविकाला करोनाची बाधा झाल्याचे ७ एप्रिल रोजी उघड झाले होते. आयएनएस आंग्रे येथे २० नाविक त्याच्या संपर्कात आले होते. या सर्वाना करोनाची बाधा झाल्याचे शनिवारी स्पष्ट झाले. हे सर्व जण आयएनएस आंग्रे येथे एकत्र राहात होते.
नाविकांना करोनाची बाधा झाल्याचे उघड झाल्यानंतर तात्काळ आयएनएस आंग्रे इमारतीला टाळेबंदी करण्यात आली. तसेच तेथे निर्जंतुकीकरणही करण्यात आले. या २१ जणांना नौदलाच्या आयएनएचएस रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.