breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण
#CoronaVirus: भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना कोरोनाची लागण
![Jury case filed against BJP leader Gopichand Padalkar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/gopichand_padalkar.jpg)
सांगली: सांगलील जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढतच आहे. अशात आणखी एका लोकप्रतिनिधीला कोरोनाची लागण झालेली आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आलेला आहे.
त्यांची नुकतीच कोरोना चाचणी करण्यात आलेली होती. मुंबईत अधिवेशनासाठी गेलेले आहेत. तेथे पोहोचल्यानंतर त्यांचा अहवाल आज ‘पॉझिटीव्ह’ आला आहे. त्यांना कोणताही त्रास नसून प्रकृती ठीक असल्याचे निकटवर्तीयांनी सांगितलेले आहे.