breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
#CoronaVirus: प्रवासी मजुरांना पुढील दोन महिन्यांसाठी मोफत धान्य पुरवठा- निर्मला सीतारामन
प्रवासी मजुरांना पुढील दोन महिन्यांसाठी मोफत धान्य पुरवठा केला जाईल अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केली. ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही त्यांनाही धान्य मिळणार असंही स्पष्ट करण्यात आलं. प्रति महिना ५ किलो धान्य गरीबांना दिलं जाणार आहे असंही निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं. याचा फायदा ८ कोटी प्रवासी मजुरांना होईल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. वन नेशन आणि वन रेशन कार्ड ही योजनाही येत्या काळात आम्ही आणतो आहोत. ज्यामुळे उद्या असं काही संकट आलं तर गरीबाना देशातल्या कोणत्याही रेशन डेपोमधून धान्य उपलब्ध होऊ शकेल असंही स्पष्ट करण्यात आलं.