breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

#CoronaVirus: पडळकरांची पवारांवर टीका, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलांची प्रतिक्रिया काय?

मुंबई : भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या जहरी टीकेवर भाजप प्रदेशाध्यक्षांनी मौन बाळगले आहे. “मी या विषयावर बोलणार नाही” असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया देणे टाळले आहे. “शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत” अशा शब्दात काल पडळकरांनी पवारांवर टीका केली होती.

पडळकरांवर कडक कारवाई करण्याचा इशारा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिलेला आहे. भाजपच्या नेत्यांनी त्यांना समज द्यावी, अन्यथा कडक कारवाई करणार असल्याचे संकेत शंभुराज देसाई यांनी दिलेले आहेत. त्यामुळे भाजप आपल्या नवनिर्वाचित आमदारावर कारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button