TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्याप्रती प्रेम म्हणून अश्विनी जगताप यांना विजयी करा : पंकजा मुंडे

चिंचवड :दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या प्रती प्रेम व्यक्त करण्याची हीच योग्य वेळ आहे. चिंचवडच्या जनतेने अश्विनी लक्ष्मण जगताप यांना साथ देऊन दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या राजकीय कारकि‍र्दीवर आणि त्यांनी केलेल्या विकासकामांवर प्रेम व्यक्त करावे, असे आवाहन भाजपच्या नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे. त्य़ा आज (रविवारी) आयोजित प्रचार सभेत बोलत होत्या.

यावेळी अश्विनी लक्ष्मण जगताप, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार अमर साबळे, भाजपचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार, रिपब्लिकन पार्टी आठवले गटाचे शहराध्यक्ष स्वप्निल कांबळे, राज्याच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे, राष्ट्रीय समाज पक्षाचे शहराध्यक्ष भारत महानवर यांच्यासह भाजप, शिवसेना, रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम संघटना आणि प्रहार संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

पंकजा मुंडे म्हणाल्या, लक्ष्मण जगताप यांनी शहरातील प्रश्नांसाठी आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते भाजपमध्ये आले आणि राज्यात भाजप-शिवसेना युतीची सत्ता आली. दिवंगत गोपीनाथ मुंडे खासदार झाले आणि केंद्रात मंत्री झाले. त्यानंतर सहाव्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला. या धक्क्यातून आमच्या कुटुंबांसह त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लाखो लोकांना सावरता आले नाही. गेलेल्या माणसाची जबाबादारी सांभाळताना काय कसरत करावी लागते याची मला जाणीव आहे. आज दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनाही तशीच कसरत करताना मी पाहिले आहे. पती आपल्यामध्ये नाही हे दुःख बाजूला ठेवून संयम आणि जबाबदारीने त्या वागत आहेत. लोकांसमोर बोलत आहेत. एक स्त्री म्हणून मला त्यांचा अभिमान वाटतो.

आज मी दिवंगत लक्ष्मण जगताप यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी येथे आले आहे. त्यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या पाठीशी एक बहीण म्हणून उभे राहण्यासाठी मी आले आहे. माझा बाप अचानक गेल्यानंतर मला जनसेवेसाठी वाघीण व्हावे लागले. अश्विनी जगताप या सुद्धा वाघीणच आहेत. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी अनेक वर्षे सेवा केली. लक्ष्मण जगताप यांनी शून्यातून विश्व निर्माण केले. पिंपरी-चिंचवडचा विकास करताना लक्ष्मण जगताप लढले. ते अपक्ष आमदार असताना काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार होते.

आमदारकीची राजीनामा देऊन ते भाजपमध्ये आले. भाजपचे सरकार आल्यानंतर त्यांनी शहरातील प्रलंबित आणि किचकट प्रश्न सोडवले. या राज्यात सामान्यांची चिंता करणारी सत्ता प्रस्थापित झाली आहे. सत्तेबाहेर असतानाही येथील जनतेने दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर प्रेम केले. (Chinchwad Bye-Election) त्यांचे शहराच्या विकासाचे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप यांना साथ देऊन त्यांच्या कारकि‍र्दीवर प्रेम व्यक्त करा, असे आवाहन त्यांनी केले

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button