breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारण

संसदेच्या सुरक्षेवरून विरोधकांचा गोंधळ, लोकसभेतील १४ तर राज्यसभेतील एका खासदाराचं निलंबन

नवी दिल्ली : संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असताना दोन तरुणांनी सुरक्षा व्यवस्था भेदून सभागृहात प्रवेश केल. यानंतर नव्या संसदभवनाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आज दोन्ही सभागृहांमध्ये विरोधकांनी गोंधळ घातला. सभागृहात घातलेल्या गोंधळामुळं १५ खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये लोकसभेतील १४ तर राज्यसभेतील एका खासदाराचा समावेश आहे. संपूर्ण हिवाळी अधिवेशनासाठी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

संसद सुरक्षा भंग झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज लोकसभेचे कामकाज सुरू होताच गदारोळ सुरू झाला. विरोधी पक्षाच्या काँग्रस खासदारांनी जोरदार घोषणाबाजी करत, सभागृहात गदारोळ घातला. दरम्यान ‘अनियमित वर्तन’ केल्याबद्दल १५ खासदारांचे निलंबन करण्यात आलं आहे.

‘या’ खासदारांचं निलंबन

लोकसभा : माणिकम टागोर, कनिमोळी, पीआर नटराजन, व्ही के श्रीकांतम, बेनी बहन, के सुब्रमण्यम, एसआर प्रतिभा, एस व्यंकटेश, मोहम्मद जावेद, टीएन प्रतापन, हिबी इडेन, ज्योतीमनी, रम्या हरिदास, डीन क्युरिकोस.

राज्यसभा :  तृणमूल काँग्रेस खासदार दारेक ओब्रायन.

हेही वाचा  – बीसीसीआयने अर्जुन पुरस्कारासाठी केली मोहम्मद शमीच्या नावाची शिफारस 

काल संसदेत काय घडलं?

लोकसभेच्या मुख्य सभागृहात दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून मुख्य सभागृहात उडया घेतल्या. यानंतर त्यांनी धुराच्या नळकांडया फोडल्या. यामुळे नव्या संसदभवनाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. घुसखोरांना उपस्थित खासदारांनी चोप दिला व सुरक्षा रक्षकांकडे सोपविले. त्याच वेळी संसदभवन परिसरात नीलम व अमोल शिंदे या दोघांनीही घोषणाबाजी करत धुराच्या नळकांडया फोडल्या. त्यांनाही पोलिसांनी अटक केली. अमोल हा लातुर जिल्ह्यातील असून शर्मा लखनऊ, मनोरंजन म्हैसूर तर नीलम हरियाणातील हिस्सारची राहणारी आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button