Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

खुर्च्या फेकल्या, जोरदार घोषणाबाजी..; अमरावतीत नवनीत राणांच्या सभेदरम्यान राडा

Navneet Rana | राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या प्रचारसभा सुरू आहेत. यातच अमरावतीमध्ये भाजपाच्या माजी खासदार नवनीत राणा यांच्या प्रचारसभेत राडा झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी काही लोकांनी नवनीत राणा यांच्यासह त्यांच्या काही कार्यकर्त्यांवर खुर्च्या फेकत हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री दर्यापूर विधानसभा मतदारसंघातील खल्लार या गावात नवनीत राणा यांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी नवनीत राणा यांचं भाषण सुरु असताना काही लोकांनी जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी नवनीत राणा यांच्या दिशेने खुर्च्या फेकत काही लोकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर आज नवनीत राणा यांनी माध्यमांशी संवाद साधत काल झालेल्या सभेत नेमकं काय घडलं होतं? याबाबत माहिती सांगितली. तसेच यावेळी नवनीत राणा यांनी सभेत राडा घालणाऱ्यांना इशारा देत गंभीर आरोप केले आहेत. ‘काल सभेनंतर खुर्च्या फेकण्यात आल्या, माझ्यावर थुंकण्याचा प्रयत्न करण्यात आला’, असे गंभीर आरोप नवनीत राणा यांनी केले आहेत.

हेही वाचा     –        ‘निकालानंतर महाराष्ट्रात सरप्राईज मिळतील’; राज ठाकरेंचं सूचक विधान 

नवनीत राणा म्हणाल्या, की कालच्या सभेत जवळपास २०० ते २५० अपंग लोक बसलेले होते. ते सर्व मला भेटण्यासाठी आले होते. ज्यावेळी मी सभेत भाषण करत होते. तेव्हा काहींनी वक्तव्य केले. त्यावेळी एवढ्या लांबून देखील अल्ला हू अकबरचे नारे ऐकू येत होते. त्यावेळी त्या ठिकाणी माझे काही कार्यकर्ते होते, ते ऐकत होते. तेव्हा काही चुकीचे शब्दही वापरण्यात आले. यावेळी माझ्या कार्यकर्त्यांनी त्यांना शांतता ठेवण्यास सांगितलं. आम्ही शांततेत सभा करून जाणार आहोत, असं आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं. मात्र, सभा संपल्यानंतर मी लोकांना भेटत होते. त्यावेळी मी लोकांशी संवाद साधत होते. तेव्हा तुला मारून टाकू, अशा पद्धतीची धमकी देण्यात आली. तरीही मी म्हटलं की शांतता ठेवा. पण त्याचवेळी लगेच काहींनी खुर्च्या उचलल्या आणि आमच्या लोकांवर फेकल्या. त्यानंतर आमच्या काही लोकांनी मला गाडीत बसवलं. मी नसते तर खल्लार गावातील दोन लोकांचा जीव त्या लोकांनी घेतला असता.

एवढंच नाही तर माझ्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला. तसेच माझ्याबरोबर असलेल्या महिला सुरक्षारक्षकांनाही काही खुर्च्या लागल्या. या सर्व प्रकरणावरून हे लक्षात येतं की, जे व्यक्ती आपल्या विचारांसाठी लढत आहेत. जो विचार आपण घेऊन चालत आहोत. आम्ही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार घेऊन पुढे जाणारे लोक आहोत. आम्ही संविधानाला मानणारे लोक आहोत. मात्र, जर त्यांची भाषा कापण्याची असेल तर आमचीही भाषा त्याच पद्धतीची असेल. आम्ही देखील शांत बसणार नाहीत, असा इशारा नवनीत राणा यांनी दिला.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button