Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजन

आलिशान बंगला, महागड्या गाड्यांचं कलेक्शन अन्…; बॉलीवूडमधील ‘हे’ अभिनेते वयाच्या साठीनंतरही कमावतायत कोट्यवधी

This Bollywood Star Earns Crores Every Month : काही कलाकारांना चिरतरुण राहण्याचं जणू वरदान मिळालेलं असतं. वयाची साठी ओलांडल्यानंतरही अनेक तरुणांना लाजवेल असा त्यांचा फिटनेस, प्रेझेन्स आणि काम करण्याची पद्धत असते. यापैकीच एक नाव म्हणजे बॉलीवडचे नायक अनिल कपूर. अनिल कपूर यांनी मुख्य नायकाची, विनोदी अशा विविध भूमिका साकारल्या आहेत. गेली कित्येक वर्षे ते या क्षेत्रात सक्रिय आहेत आणि त्यांच्या कामातून ते प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत.

अनिल कपूर सध्या त्यांच्या ‘सुभेदार’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहेत. ५ मार्चला हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. यामध्ये ते प्रमुख भूमिकेत आहेत. वयाच्या ६९ व्या वर्षीसुद्धा ते त्यांच्या स्क्रीन प्रेझेन्सने आणि सदाबहार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत. अनिल कपूर यांनी यापूर्वीसुद्धा अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का, इंडस्ट्रीत गेली अनेक दशकं सक्रिय असलेले अनिल कपूर यांची किती संपत्ती आहे?

हेही वाचा –  महाराष्ट्र शासन आणि ब्रिस्टॉल विद्यापीठ यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

सेलिब्रिटी नेटवर्थच्या अहवालानुसार अनिल कपूर यांची नेटवर्थ जवळपास ३३० कोटी रुपये इतकी आहे. ते अभिनय, जाहिराती, ब्रँड अँडोर्समेंटमधून कमाई करतात; त्यामुळे अनिल कपूर बॉलीवूडमधील श्रीमंत कलाकारांपैकी एक आहेत. माध्यमांच्या वृत्तानुसार अनिल कपूर देशातील सर्वाधिक कर भरणाऱ्या मंडळींपैकी एक आहेत. जीक्यूच्या वृ्त्तानुसार अनिल कपूर दर वर्षाला १२ कोटी रुपये कमावतात. याचा अर्थ दर महिन्याला ते एक कोटींची कमाई करतात. ते एका चित्रपटासाठी दोन कोटी रुपये माधन घेतात. अनिल कपूर यांची लाइफस्टाइल खूप महागडी असून त्यांचा मुंबईतील जुहू येथे एक बंगला आणि गाड्यांचं कलेक्शन आहे.

अनिल कपूर यांच्या कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचं झालं तर त्यांचे वडील दिवंगत सुरिंदर कपूर निर्माते होते. त्यांचे मोठे भाऊ बोनी कपूरसुद्धा निर्माते आहेत. बोनी कपूर यांची निर्मिती असलेल्या चित्रपटांमध्ये अनिल कपूरने कामही केलं आहे. शिवाय त्यांची लेक सोनम कपूरसुद्धा अभिनेत्री आहे.

दरम्यान, अनिल कपूर यांच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी ‘मिस्टर इंडिया’, ‘तेजाब’, ‘बेटा’, ‘राम लखन’, ‘लाडला’, ‘जुदाई’, ‘वेल्कम’, ‘नायक’ यांसारख्या अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांत काम केलं आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button