breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

मोठी बातमी! मराठा समाजाला उद्यापासून कुणबी प्रमाणपत्र मिळणार

मुंबई : मराठा आरक्षणप्रश्नी मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक आज पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांना दाखले देणार आहोत. याबाबत उद्यापासूनच दाखले द्यायला सुरू करणार आहोत, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात आणि मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू आहे या पार्श्वभूमीवर अतिशय महत्वाच्या उपसमितीच्या बैठकीला मी आज हजर होतो. या बैठकीत अतिशय तपशीलवार चर्चा झाली. जुन्या कुणबी नोंदी शोधण्यासाठी ज्या न्यायमूर्ती शिंदे समितीचं गठण करण्यात आलं होतं त्या समितीने प्रथम अहवाल आज सादर केला. तो अहवाल उद्या आम्ही कॅबिनेटमध्ये घेऊन तो स्वीकारून त्याची पुढची प्रक्रिया करणार आहोत. शिंदे समितीने जवळपास १ कोटी ७२ लाख कागदपत्रांची, प्रकरणांची तपासणी केली. त्यापैकी ११ हजार ५३० कुणबी जुन्या नोंदी आढळल्या आहेत. त्यांनी संपूर्ण सविस्तर अहवाल सादर केला आणि फार जुने जुने रेकॉर्ड तपासले आहेत. त्यामध्ये काही तपास उर्दू आणि मोडीमध्ये सापडले आहेत. पुढेही त्यांनी हैदराबादमध्ये जुने पुरावे, नोंदी त्या कागदपत्रांसाठी विनंती केली आहे.

हेही वाचा – मनोज जरांगेंना भेटण्यासाठी आलेल्या महिला आंदोलक भावूक; म्हणाल्या..

आणखी काही नोंदी सापडतील म्हणून दोन महिन्यांची सरकारकडे मुदत मागितली आहे. खूप चांगल्या प्रकारे काम केलं आहे. अनेक पुरावे तपासले आहेत. १५-१६ पुरावे तपासले आहेत. अत्यंत सखोल काम केलं आहे. त्यामुळे सरकारने दोन महिन्यांची मुदत दिली आहे. त्यांच्या कामाचा आवाका आणि कामातून आलेलं आऊटपूटचं प्रमाण मोठं आहे. दोन महिन्यांचा अवधी असला तरीही तुमचा अहवाल लवकरात लवकर सादर करा, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात रद्द झालं असून त्यावर सरकार काम करत आहे. पुनर्विचार याचिकेत सर्वोच्च न्यायालायने क्यु प्रोसेसमध्ये मॅटर लिस्टिंगमध्ये टाकलं आहे. त्यावरही सरकारचं युद्धपातळीवर काम सुरू आहे. त्रुटी दूर करण्यासाठी आज आम्ही माजी न्यायमूर्ती गायकवाड, माजी न्यायमूर्ती भोसले आणि न्यायमूर्ती शिंदे यांचा एक अॅडवायजरी बोर्ड स्थापन केला आहे. गायकवाड यांचा अहवाल होता, दुसरा भोसलेंचा होता आणि या दोन्ही अहवालांवर शिंदे काम करत आहेत. त्यामुळे बोर्ड स्थापन निर्णय घेतला आहे. तीन निवृत्त न्यायमूर्तीं मराठ्यांना टिकणारं मराठा आरक्षण देण्यासंदर्भात मार्गदर्शन करेल, असा निर्णय झाला. एक टास्क फोर्स गठीत केला आहे. दरम्यान, ज्यांच्या जुन्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यांना तत्काळ कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु, हा जुनाच निर्णय असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button