Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

महापालिका निवडणुकीतही विजयरथ कायम राहील; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis | आगामी महापालिका निवडणुकांमध्येही आपला विजयरथ कायम राहील, नगरपालिकांच्या निवडणुकांमधील सकारात्मक सुरुवात पुढील महापालिका व त्यानंतर होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही दिसून येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. सोमवारी नागपूरमधील मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान रामगिरी येथे नागपूर जिल्ह्यातील विजयी नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ते बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आता महापालिका निवडणुका आहेत. विजयाची सुरुवात झाली आहे. तिचे प्रतिबिंब महापालिका, त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही उमटेल. सगळीकडे आपला विजयरथ चालू राहील. विजय मिळाला म्हणून कुणीही मातू नये. विजय हा शेवट नसून तो अधिक जबाबदारीची सुरुवात असतो. आपली भूमिका स्पष्ट, प्रामाणिक आणि जनतेच्या हिताची असली पाहिजे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा     :        आम्ही एकत्र आलो, काका-पुतणे एकत्र आले तर..; संजय राऊतांचं विधान चर्चेत 

या निवडणुकीच्या निकालानंतर भाजप हा महाराष्ट्रातील क्रमांक एकचा पक्ष असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपचे नगराध्यक्ष विजयी होण्याचा स्ट्राईक रेट ६५ टक्के आहे. तर महायुतीचे ७५ टक्के नगराध्यक्ष विजयी झाले आहेत. आमचे २१० नगराध्यक्ष निवडून आले. तर महाविकास आघाडीचे सुमारे ५० नगराध्यक्ष आहेत. आघाडी भुईसपाट झाली आहे. भाजपचे तब्बल तीन हजारांहून अधिक नगरसेवक निवडून आले आहेत. हा एक विक्रम आहे.

जनतेने भाजपच्या विकासात्मक धोरणांवर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला आहे. नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांच्या निकालातून हा विश्वास स्पष्टपणे दिसून येतो. कामठी नगरपालिकेच्या स्थापनेपासून पहिल्यांदा भाजपचा नगराध्यक्ष झाला आहे. याचे सर्व श्रेय महसूलमंत्री बावनकुळे यांना जाते. त्यांनी विधानसभेत कमी मते मिळाल्यानंतर वचपा काढण्याचा चंग बांधला होता. त्यांनी तो नगरपालिकेच्या निवडणुकीत यश मिळवून काढला. सावनेर, रामटेक आणि भिवापूर येथील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांवर भाजपने वर्चस्व प्रस्थापित केले असून त्यामुळे ही तीनही शहरे काँग्रेसमुक्त झाली आहेत, असेही फडणवीस म्हणाले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button