मुख्यमंत्री अजित पवार; पुण्यात झळकले बॅनर
![Chief Minister Ajit Pawar; Banners displayed in Pune](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/11/Ajit-Pawar-6-780x470.jpg)
Ajit Pawar | विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर आता सर्वांना निकालाची उत्सुकता लागली आहे. शनिवारी (२३ नोव्हेंबर) होणार्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्याआधी संपुर्ण महाराष्ट्रात उमेदवारांचे भावी आमदार म्हणून बॅनर लागले आहेत. अशातच बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांचे मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर लागले आहेत.
पर्वतीमध्ये अजित पवारांचे बॅनर झळकले असून निकालाच्या आधीच झळकेलल्या या बॅनर्सने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मोठ्या मताधिकाऱ्याने विजयी झाल्याबद्दल अभिनंदन असं या बॅनरवर लिहिलेलं आहे. विशेष म्हणजे अजित पवारांचा उल्लेख ‘मुख्यमंत्री’ असा करण्यात आला आहे. “मुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार प्रचंड बहुमताने विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन,” असं मजकूर या बॅनरवर आहे.
हेही वाचा – ‘राज्यात महाविकास आघाडीच्या १६० जागा निवडून येतील’; संजय राऊतांना विश्वास
बारामती तालुक्यातील सुपा परगणा परिसरातील प्रशांत शरद बारवकर मित्र परिवाराच्या वतीने बॅनर उभारण्यात आला आहे. सदर बॅनर वर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विजयाचा नाम उल्लेख करत “भावी मुख्यमंत्री” तसेच आठव्यांदा आमदार झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा…या आशयाचा बॅनर लावण्यात आला आहे.