breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

‘३० तारखेपर्यंत पुणे भाजपात मोठे बदल होणार’; चंद्रशेखर बावनकुळेंचे संकेत

मुंबई : २०२४ पर्यंत भाजपात मोठे नेते येतील. राज्यात ब्लास्ट झालेले दिसतील. खूप मोठी नावं समोर येतील. कसब्याचा बदला आम्ही काढणार आहोत. ३० तारखेपर्यंत पुणे भाजपात मोठे बदल होतील, असे संकेत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आम्ही २०२४ मध्ये राज्यात चांगला विजय मिळवू. मोदींच्या नेतृत्वात आम्ही २०२४ मध्ये देशात सरकारं आणू. राज्यभर ३५ लाख कार्यकर्ते काम करतील. भाजपा कागदावर कधीचं बोलत नाही ३ विरुद्ध एकची लढाई होती म्हणून आम्ही कसबा हरलो. पण आता युती म्हणून आम्ही तयार आहोत. राज्यात आमच सरकारं काम करत आहे. जनता भुलथापला बळी पडणार नाही. जनतेचा फडणवीस अणि शिंदे यांच्यावर विश्वास आहे. आम्ही आमचे प्रयत्न करत आहोत. कसब्याचा बदला आम्ही काढणार आहोत. ३० तारखेपर्यंत पुणे भाजपात मोठे बदल होतील.

हेही वाचा – वाहनचालकांकडून पैसे उकळणारे दोन वाहतूक पोलिस निलंबित

१०० टक्के सगळे आमदार त्यांच्या मतदार संघात ठाम आहेत. हे सगळं उद्धव ठाकरे यांचं फेल्युअर आहे. राज्यात आलेले सरकार नैसर्गिक आहे. २०१९ मध्ये सगळे आमदार युती म्हणून निवडून आले आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील हे त्या सगळ्यांनी मान्य केलं होतं. हे सगळे भाजप-सेना मतदानावर निवडून आले होते. ते काही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मतावर हे निवडून आले नाहीत, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

संजय राऊतला मुंबईत कुणी आलं की त्यांची सेना किंचित होईल. त्यांचे नेते भाजपात येतील ही त्यांची भिती. जे पी नड्डा सगळीकडे फिरत आहेत. संजय राऊत यांना मिरची यासाठी लागली असेल की आम्ही म्हणालो की, मुंबई आम्ही जिंकू. बघू कोण हारतं कोण जिंकत घोडे मैदान लांब नाही. संजय राऊत यांना निवडणुकीत कळेल की जे पी नड्डा काय आणि कोण आहेत, असा टोलाही बावनकुळेंनी संजय राऊतांना लगावला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button