“बहुमत चाचणीत १६४ संख्याबळ १८४ होईल”; भाजप नेत्याचा दावा
![Chandrakant Bawankule said that the strength of 164 will be 184 in the majority test](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/devendra-fadnavis-and-eknath-shinde-780x470.jpg)
सत्यजीत तांबे यांना भाजपमध्ये या असे म्हटलेलं नाही आणि म्हणणारही नाही
मुंबई : राज्यात बहुमताचे सरकार आहे. उद्या विरोधकांनी बहुमत सिद्ध करा अशी मागणी केली. तरी महाराष्ट्रात बहुमत सिद्ध करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समर्थ आहेत. तेव्हा १६४ आमदारांचे संख्याबळ १८४ होईल, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे.
चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?
राज्यात बहुमताचे सरकार आहे. उद्या विरोधकांनी बहुमत सिद्ध करा अशी मागणी केली. तरी महाराष्ट्रात बहुमत सिद्ध करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समर्थ आहेत. तेव्हा १६४ आमदारांचे संख्याबळ १८४ होईल, असं म्हटलं आहे.
नाशिक पदवीधर मतदार संघातील अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांना भाजपमध्ये या असे म्हटलेलं नाही आणि म्हणणारही नाही. जोपर्यंत सत्यजीत तांबे स्वत:हून भाजपमध्ये येण्याचे म्हणत नाहीत. तोपर्यंत यावर भाष्य नको, असंही चंद्रकांत बावनकुळे म्हणाले.