पहाटेची शपथविधी ही पवारांची खेळी; चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘उशिरा मिळालेल्या शहाणपण..’
![Chandrakant Patil said wisdom received late..](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/chandrakant-patil-3-1-780x470.jpg)
मातोश्री माझ्यासाठी बंद आहे की खुली हे मी टेस्टिंग केलेलं नाही
पुणे : पहाटेची शपथविधी ही पवारांची खेळी होती असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. गौप्यस्फट हे त्या त्या वेळेस का केले जात नाही. त्यामुळे अशा उशिरा मिळालेल्या शहाणपणाला, माहितीला काहीच अर्थ नसतात. त्यामुळे या गोष्टीला काहीही अर्थ नाही, असा टोला पुण्याचे पालक मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लगावला.
कसबा आणि चिंचवड पोट निवडणुकी बाबत विचारलं असता ते म्हणाले की, नावांची शॉर्ट लिस्ट तयार करण्यात आली आहे. ती केंद्रात पाठविण्यात येणार आहे. तेव्हा केंद्रीय नेतृत्व 30 किंवा 1 तारखेला बसून निर्णय घेईल आणि तेव्हाच नावं घोषित करण्यात येतील.
राज्यातील राजकारणातील मी इतका खालचा नेता आहे. 2014 साली मी 30 वेळा मातोश्रीवर गेलो आणि त्यानंतर सत्ता असताना देखील मातोश्रीवर गेलो. मातोश्रीवर जायचं माझ्या पक्षाने अजून आदेश दिलेले नाही म्हणून मी देखील टेस्टिंग केलेलं नाही की मातोश्री माझ्यासाठी बंद आहे की खुल आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
कोयता गँग मधील आत्ता जे सापडत आहे ते भुरटे सापडत आहेत. इझी मनी साठी लागलेली ही सवय आहे. कोयता गँग वर मोक्का लावण्याचे सूचना मी पोलीस आयुक्तांना दिले आहेत. जो पर्यंत 50 ते 60 लोकांवर कारवाई होत नाही तो पर्यंत कळणार नसल्याचं यावेळी पाटील म्हणाले.