TOP News । महत्त्वाची बातमीअध्यात्म । भविष्यवाणीटेक -तंत्र । उद्योग । व्यापारताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

भाजपातर्फे ‘सोशल मीडिया इंफ्ल्युएसंर संमेलन’ उत्साहात

मोदी @9 महा-जनसंपर्क अभियानाची प्रभावी अंमलबजावणी; अभियानाचे मावळ लोकसभा संयोजक बाळा भेगडे यांची माहिती

पिंपरी । प्रतिनिधी
मावळ लोकसभा मतदार संघांतर्गत भारतीय जनता पार्टीच्या ‘सोशल मीडिया इंफ्ल्युएसंर संमेलन’ यशस्वीपणे पार पडले. मतदार संघात मोदी @9 महा-जनसंपर्क अभियान प्रभावीपणे राबवण्यात येत आहे, अशी माहिती अभियानाचे मावळ लोकसभा संयोजक बाळा भेगडे यांनी दिली.
भारताते कर्तृत्ववान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला ९ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त मोदी सरकारचे ऐतेहासिक निर्णय, विकासकामे व जनहितार्थच्या योजना यांची माहिती जनतेपर्यंत पोहचावी, याकरिता देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघांमधे महा-जनसंपर्क अभियान व मोदी@9 चे कार्यक्रम सुरू आहेत.

याच अभियानाच एक भाग मावळ लोकसभा मतदारसंघातील सोशल मीडियावरील प्रभावशाली व्यक्तींचे ‘सोशल मीडिया इंफ्ल्युएसंर संमेलन’ पिंपळे सौदागर येथील प्रसिद्ध ‘हॅाटेल गोविंद गार्डनच्या बॅंक्वेट हॅाल’ मध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

राज्याचे माजी मंत्री व मोदी@9 चे मावळ लोकसभेचे संयोजक बाळा भेगडे यांनी उपस्थित ‘सोशल मेडिया इंफ्ल्युएसंर’ ना मार्गदर्शन केले. यावेळी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, चिंचवड विधानसभेच्या आमदार अश्विनी जगताप, माजी महापौर माई ढोरे, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस ॲड.मोरेश्वर शेडगे, सोशल मेडिया इंफ्ल्युएसंर संमेलनाचे मावळ लोकसभेचे संयोजक शत्रुघ्न काटे, पिंपरी विधानसभा संयोजक राजेश आण्णा पिल्ले, मावळ विधानसभा संयोजक सागर शिंदे, चिंचवड विधानसभा संयोजक अमेय देशपांडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य चंद्रकांत आण्णा नखाते, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख काळूराम बारणे, माजी नगरसेविका उषा मुंढे, अश्विनी चिंचवडे, आरती चौंधे, शारदा सोनावणे, निर्मला कुटे, माजी नगरसेवक संदिप आण्णा कस्पटे, राजेंद्र गावडे, सुरेश भोईर, बाबा त्रिभुवन, तानाजी बारणे यासंह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व मावळ लोकसभेतील ‘सोशल मेडिया इंफ्ल्युएसंर’ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी पीयुष पाटील, कुणाल मोरे व प्रणय राज गोस्वामी या सोशल मेडिया इंफ्ल्युएसंरनी उपस्थितांशी सोशल मिडियाचा वापर कसा केला पाहिजे याची माहिती दिली व आपले अनुभव सांगीतले. मावळ लोकसभेचे संयोजक शत्रुघ्न बापू काटे यांनी प्रस्ताविक व मोदी@9 चे जिल्हा सहसंयोजक ॲड.मोरेश्वर शेडगे यांनी सूत्रसंचालन, तर चिंचवड विधानसभा संयोजक अमेय देशपांडे यांनी आभार मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button