भाजपाचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी थोपटले दंड..!, “अबकी बार १२५ पार”
पिंपरी :
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांनी ज्यापध्दतीने पिंपरी चिंचवड शहरात पक्ष संघटना वाढवण्याचे कार्य केले, त्याच प्रमाणे मी देखील पक्षवाढीचे काम करणार असल्याचा विश्वास भाजपाचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर आगामी महापालिका निवडणुकीत “अबकी बार १२५ पार” जागा मिळवत निर्विवाद सत्ता कायम ठेवणार असल्याचा दावा जगताप यांनी केला आहे.
पिंपरी चिंचवड भाजपाच्या शहराध्यक्षपदी शंकर जगताप यांची आज निवड करण्यात आली आहे. जगताप यांची निवड होताच सर्वच पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पिंपळे गुरव येथील त्यांच्या कार्यालयाजवळ शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती. त्यावेळी शंकर जगताप यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
ते म्हणाले की, पक्षाने माझ्यावर जो विश्वास टाकलेला आहे, तो विश्वास सार्थ करण्याचा मी पूर्ण प्रयत्न करणार आहे. ज्या दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे यांनी ज्या पद्धतीने पक्ष संघटना वाढवण्याचे काम केलं, त्याचप्रमाणे मी देखील पक्ष संघटना वाढीचे काम करणार आहे.