भाजप खासदाराची लोकसभेत शिवीगाळ; म्हणाले, ए भ**, दहशतवादी..

नवी दिल्ली : १८ ते २१ सप्टेंबर या कालावधीमध्ये लोकसभेचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं होतं. या अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक व नव्या संसद भवनातून कामकाजाला सुरुवात या दोन प्रमुख गोष्टी घडल्या. मात्र, याचवेळी काही सदस्य आक्रमक झाल्याचंही दिसून आलं. भाजपाचे दक्षिण दिल्लीतील खासदार रमेश बिधुरी हे त्यातलेच एक बिधुरींनी आपल्या भाषणात चक्क शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
भाजपा खासदार रमेश बिधुरी भाषण करताना या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. चांद्रयान मोहिमेचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाटल्याचा आरोप विरोधकांनी केला. यावरून भाजपचे खासदार चांगलेच भडकले. बिधुरी यांनी रागाच्या भरात त्यांनी थेट शिवीगाळ करायला सुरुवात केली. हे सगळं हे बिधुरी बसपाचे खासदार दानिश अली यांना उद्देशून म्हणत असल्याचं सांगितलं जात आहे.
हेही वाचा – ‘धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत शासन सकारात्मक’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
“ओए भड़वे, ओए उग्रवादी, कटुवे, आतंकवादी, बाहर देखूँगा इन मुल्ले को”
– BJP सांसद रमेश बिधूड़ी pic.twitter.com/mmUjCNH2iu
— Utkarsh Singh (@UtkarshSingh_) September 22, 2023
मोदीजी श्रेय घेत नाहीयेत. श्रेय देशाचे वैज्ञानिक घेत आहेत. ए भ**…ए उग्रवादी..बोलू देणार नाही तुला कधी उभं राहून. सांगून ठेवतोय. ए उग्रवादी..कठुवे…हे दहशतवादी आहेत… उग्रवादी आहेत.. हे मुल्ला दहशतवादी आहेत. याचं काही ऐकू नका, बाहेर फेका याला, असं रमेश बिधुरी म्हणाले.
दरम्यान, देशांचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सभागृहात दिलगिरी व्यक्त केली. जर (सत्ताधारी) सदस्यांच्या कोणत्याही विधानामुळे विरोधी पक्षांच्या भावना दुखावल्या अशतील, तर मी त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो, असं राजनाथ सिंह म्हणाले.





