भाजपच्या पहिल्या यादीत 10 मराठा,१३ महिला उमेदवारांना संधी
भाजपने जाहीर केलेली ही यादी जवळपास ९९ जणांची असून यात भाजपने एक मोठी खेळी
महाराष्ट्र : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय क्षेत्रात मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत. त्यातच आता भाजपने एक पाऊल पुढे टाकत सर्वात आधी विधानसभा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपच्या पहिल्या यादीत नागपूर जिल्ह्यातून नागपूर द. पश्चिमधून देवेंद्र फडणवीस यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर कामठीमधून चंद्रशेखर बावनकुळे, नागपूर दक्षिणमधून मोहन मते, नागपूर पूर्वमधून कृष्ण खोपडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपने जाहीर केलेली ही यादी जवळपास ९९ जणांची असून यात भाजपने एक मोठी खेळी केली आहे.
लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाच्या मतांचा फटका बसल्यानतंर आता विधानसभेत भाजपने 10 मराठा उमेदवारांना संधी दिली आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या बालेकिल्ल्यातून एक, दोन नव्हे तर तब्बल 10 उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. भाजपच्या पहिल्या यादीत मराठवाड्यातील 10 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. तसेच मराठवाड्यातील इतर 6 जागांवर विविध जातीतील उमेदवारांना संधी देण्यात आली आहे.
भाजपचे 10 मराठा उमेदवार कोण?
श्रीजया चव्हाण – भोकर
राजेश पवार – नायगाव
तानाजी मुटकुळे – हिंगोली
मेघना बोर्डीकर – जिंतूर
बबनराव लोणीकर – परतूर
संतोष दानवे – भोकरदन
अनुराधा चव्हाण- फुलंब्री
संभाजी निलंगेकर – निलंगा
अभिमन्यू पवार – औसा
राणा जगजितसिंह पाटील – तुळजापूर
भाजपकडून इतर जातीच्या कोणत्या उमेदवारांना संधी
तुषार राठोड – मुखेड (ओबीसी)
भीमराव केरम- किनवट (एसटी)
नमिता मुदंडा – केज (एसी)
अतुल सावे – संभाजीनगर पूर्व (ओबीसी)
प्रशांत बंब – गंगापूर (मारवाडी)
नारायण कुचे – बदनापूर (एसी)
13 महिलांना उमेदवारी घोषित
पहिल्या यादीत भाजपनं 13 महिलांना संधी दिली आहे. श्रीगोंद्यातून प्रतिभा पाचपुते, पर्वतीत माधुरी मिसाळ, जिंतूरमधून मेघना बोर्डीकर, भोकरमधून श्रीजया चव्हाण, फुलंब्रीमधून अनराधा चव्हाण, गोरेगावमधून विद्या ठाकूर, बेलापुरातून मंदा म्हात्रे, चिखलीमधून श्वेता महाले, दहिसरमधून मनीषा चौधरी, केजमधून नमिता मुंदडा, शेवगावमधून मोनिका राजळे, नाशिक पश्चिममधून सीमा हिरे, कल्याण पूर्वेतून सुलभा गायकवाडांना उमेदवारीची संधी मिळाली आहे.