बिहारामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये एनडीएनं बाजी मारली
काँग्रेसला सर्वात मोठा धक्का, बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा
बिहार : बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आता हाती आला आहे. बिहारमध्ये महाआघाडीचा मोठा पराभव झाला असून, एनडीएला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे, आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तब्बल 96 जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत, तर जेडीयूला देखील मोठं यश मिळालं आहे, जेडीयू 84 जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान काँग्रेस अवघ्या दोन जागांवर आघाडीवर आहे. बिहारमध्ये काँग्रेसचा मोठा पराभव झाला आहे, बिहारमधील पराभवानंतर आता मोठी बातमी समोर आली असून, काँग्रेसला महाराष्ट्रात देखील मोठा झटका बसला आहे. बड्या नेत्यानं काँग्रेसची साथ सडोली आहे.
हेही वाचा : ताथवडे येथील पशुसंवर्धन विभागाची 15 एकर शासकीय जमीन बिनबोभाट लाटली!
बिहारच्या निकालानंतर महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे, ठाणे जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांनी तडकाफडकी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. दयानंद चोरगे हे मागील विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे भिवंडीतील उमेदवार होते. माझ्या वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत असल्याचं दयानंद चोरगे यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. मात्र त्यांनी पत्रात जरी असं म्हटलं असलं तर देखील ते गेल्या अनेक दिवसांपासून पक्षावर नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. अनेक निवडणुकांमध्ये डावलं गेल्याची खंत त्यांनी व्यक्त केली असल्याची माहिती समोर येत आहे. बिहारचा निकाल हाती येताच दयानंद चोरगे यांनी पक्षाचा आणि जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे, ऐन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोडांवर हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान बिहार निवडणुकीमध्ये काँग्रेसचा मोठा पराभव झाला आहे, त्यांना अपेक्षित असं यश मिळालेलं नाहीये. महाआघाडी अवघ्या 29 जागांवर आघाडीवर आहे, महाआघाडीमध्ये आरजेडी हा मोठा पक्ष ठरला असून, आतापर्यंत समोर आलेल्या निकालानुसार आरजेडी 25 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस अवघ्या 2 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसमुळेच आरजेडीला फटका बसला, अशी चर्चा देखील आता सुरू झाली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून, जेडीयू दुसऱ्या क्रमांकावर आहे. जेडयूपेक्षा यावेळी भाजपच्या जागा अधिक असल्यामुळे बिहारचा मुख्यमंत्री आता कोण होणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.




