Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

Breaking News : पिंपरी-चिंचवड निवडणूक प्रचार प्रमुख पदी नाना काटे यांची नियुक्ती!

मिशन-PCMC: महापालिका निवडणुकीत भाजपा-राष्ट्रवादीत आता ‘काँटे की टक्कर’

पिंपरी-चिंचवड: विशेष प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या आगामी होऊ घातलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका 2025-2026 निवडणूकीकरिता प्रचार प्रमुख पदी‍ माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांची आज (दि. 14) नियुक्ती करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सुचनेनुसार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी निवडीचे पत्र दिले.

पिंपरी चिंचवड हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला पुन्हा काबिज करण्याकरिता व तो अधिकाधिक मजबूत रहावा या दृष्टीकोनातून प्रचार प्रमुख पदी नाना काटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नाना काटे हे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक, माजी विरोधी पक्षनेते असून पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा आगामी पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या अतिशय महत्त्वपूर्ण जबाबदारीसाठी राष्ट्रवादीकडून जबाबदारीचे स्थान देण्यात येत आहे, अशी माहिती शहराध्यक्ष योगेश बहल यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button