मोठी बातमी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द!
![Big news: National party status of NCP canceled!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/04/Sharad-Pawar-2-780x470.jpg)
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसह कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आणि पश्चिम बंगाल मधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस’ या दोन पक्षांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द करण्यात आला आहे. भारतीय निवडणूक आयोगाने तशी घोषणा केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द करण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे. त्यासोबत ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेस आणि सीपीआय या पक्षाचाही राष्ट्रीय दर्जा रद्द करण्यात आला आहे. 10 जानेवारी 2000 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला होता. 2014 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचा दर्जा कायम होता. पण 2014 निवडणुकीनंतर राष्ट्रीय पक्षासंदर्भात त्यांना निवडणूक आयोगाकडून नोटीसा पाठवण्यात आल्या. अरुणाचलप्रदेश, गोवा, मणिपूर, मेघालय आणि नागालँड याठिकाणचे राष्ट्रवादीचे अस्तित्व कमी झालेले आहे.
निवडणूक आयोगाने आज संध्याकाळी याबाबतची घोषणा केली. आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमुल काँग्रस पक्ष आता प्रादेशिक पक्ष म्हणून ओळखले जाणार आहेत. निवडणूक आयोगाने पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढला हा शरद पवारांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
NCP ची लोकसभा – विधानसभा निवडणूकीतील कामगिरी.
2019 लोकसभा:
मणिपूरः 0.16%
MH: 15.52% मते मिळाली
अरूणाचल प्रदेश, गोवा, मेघालय, नागालॅंड मध्ये लढले नाही.
विधानसभाः
अरूणाचल प्रदेशः लढले नाही.
गोवा, 2017: 2.28 %
मणिपूर 2017: 0.95 %
मेघालय 2018: 1.61 %
महाराष्ट्र: 16.71 % मते मिळाली