breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

मनसेचा मोठा निर्णय! अमित राज ठाकरेंना दिली ‘ही’ महत्वाची जबाबदारी

मुंबई |

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोठा निर्णय घेतला आहे. राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मनसेच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी अमित ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी संदीप देशपांडे यांनी यासंदर्भात ट्वीट केलंय. आगामी महानगर पालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरेंची नियुक्ती करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे.

  मराठी भाषा आणि मराठी अस्मितेसाठी आग्रही असणाऱ्या मनसेकडून आज मराठी भाषा गौरवदिनाचं निमित्त साधत अमित ठाकरे यांच्याकडे विद्यार्थी संघटनेची जबाबदारी सोपवण्यात आली.

त्यांच्याकडे ही महत्वपूर्ण जबाबदारी देऊन येत्या काळात मनसेला तरुणांना सोबत घेऊन एक मजबूत पक्ष बनवायचा आहे, असं दिसून येतंय. नुकतेच मनसेच्या विद्यार्थी संघटना आणि युवा संघटनेशी संबंधित अनेक युवा नेत्यांनी पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. त्या पार्श्वभूमिवर मराठी तरुणांना मनसेकडे आकर्षित करण्यासाठी अमित ठाकरे यांच्यावर ही मोठी जबाबदारी देण्यात आली आहे, अशी चर्चा सध्या सुरू आहे.

  • राज ठाकरेंचं मराठी भाषेविषयी वक्तव्य-

आपण आपली परंपरा पुढे न्यायला की पडल्याचं राज ठाकरे यावेळी म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी जावेद अख्तर यांचा एक किस्सा देखील सांगितला. “आपण आपला डीएनए विसरलोय. महाराष्ट्रात लता मंगेशकर, आशा भोसले, दर्जेदार संगीतकार निर्माण होतात. जावेद अख्तर सांगत होते की आम्ही उत्तर प्रदेशातून आलो, आम्हाला आमच्याकडचं साहित्य ग्रेट वाटायचं. मुंबईत आल्यावर एका मित्रानं मराठी नाटकाला नेलं. ते नाटक होतं शांतता कोर्ट चालू आहे. ते म्हणाले मी ते नाटक पाहून कोलॅप्स झालो. या प्रकारचं नाटक इथे असेल, तर आम्ही आजपर्यंत काय करत होतो? सर्व बाबतीत महाराष्ट्र पुढे आहे. अशा गोष्टी आम्ही कधी पाहिल्याच नव्हत्या. ही परंपरा पुढे नेताना आपण कमी पडतोय”, असं राज ठाकरे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button