breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराजकारण

शिंदे-फडणवीसांसमोरच भुजबळांचा पारा चढला, ओबीसींच्या महाबैठकीत मोठ्या घडामोडी

मुंबई : महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या प्रमुख 10 नेत्यांची आज राज्य सरकारसोबत महत्त्वाची बैठक पार पडत आहे. मुंबईत सह्याद्री अतिथीगृह इथे ही बैठक पार पडत आहे. या बैठकीतील इनसाईड स्टोरी समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित आहेत. या बैठकीत मंत्री छगन भुजबळ आणि ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांचा चांगलाच पारा चढला. मराठा समाजाच्या अनेक नागरिकांना खोट्या नोंदींच्या आधारावर ओबीसी जात प्रमाणपत्र देण्यात आल्याचा आरोप या नेत्यांनी केला. ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांची भूमिका मांडण्यासाठी मृणाल ढोले पाटील हे देखील या बैठकीत उपस्थित होते. त्यांनीदेखील आपली भूमिका मांडली. सगेसोयरे अध्यादेश रद्द करा, अशी मोठी मागणी त्यांनी केली. तसेच दिलेल्या कुणबी नोंदींवर श्वेतपत्रिका काढा, अशीदेखील मागणी त्यांनी केली.

या बैठकीत ओबीसी नेते प्रकाश शेंडगे हे चांगलेच आक्रमक झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. “सगेसोयरेंचा अध्यादेश रद्द करा. ओबीसीतून आरक्षण देऊ नका. सगेसोयरेंच्या मुद्द्यावर 8 लाख हरकती आल्या आहेत. सरकारचा हरकतींवर आतापर्यंत निर्णय का आला नाही? मराठ्यांना दिलेल्या कुणबी नोंदी बोगस आणि खोट्या आहेत. प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याने तात्काळ नोंदी थांबवा. सगेसोयऱ्यांवर 27 तारखेला सुनावणी आहे. तोपर्यंत नोंदी थांबवा”, अशी भूमिका प्रकाश शेंडगे यांनी मांडली.

हेही वाचा     –      केंद्रीय निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु 

या बैठकीत छगन भुजबळ यांचादेखील चांगलाच पारा चढल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. “सगेसोयरेंवर आलेल्या हरकतींवर सरकारने काय केलं ते सांगा. 8 लाखांहून अधिक हरकती आल्या. त्यापुढे काय झालं? जातीचे खोटे दाखले दिले जात आहेत. त्यावर कारवाई करा. खोट्या नोंदी दाखवून खोटे दाखले दिले जात असतील तर कारवाई करा. दिशाभूल केली जात आहे. मराठ्यांना आरक्षण देण्यास विरोध नाही, मात्र दुसऱ्यांवर अन्याय नको. सरसकट दाखले दिले तर सगळे मराठा कुणबी होतील. त्यामुळे ओबीसींवर अन्याय होईल. खोटी वंशावळ दाखवून कुणबी दाखले दिले जात आहेत”, असा आरोप छगन भुजबळ यांनी केला.

लक्ष्मण हाके यांचे प्रतिनिधी मृणाल ढोले पाटील यांनी बैठकीत भूमिका मांडली. “सगेसोयरे अध्यादेश रद्द करा”, अशी मागणी त्यांनी केली. तसेच “दिलेल्या कुणबी नोंदींवर श्वेतपत्रिका काढा”, अशी मागणी लक्ष्मण हाकेंच्या प्रतिनिधी मृणाल ढोले पाटील यांनी केली. “ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देऊ नका. नोदीं या आधारकार्ड आणि पॅनकार्डशी लिंक करा”, अशी देखील मागणी मृणाल ढोले पाटील यांनी बैठकीत केली.

“ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये. त्याची स्पष्टता सरकारने करावी. दबावाखाली दाखले दिले असल्यास त्याची चौकशी करा”, असं पंकजा मुंडे या बैठकीत म्हणाल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button