breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘महादेवा, मला मंत्री करा’; शिंदे गटाचे आमदार भरत गोगावलेंचं साकडं

पुणे : शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले हे त्यांच्या वक्तव्याने कायम चर्चेत असतात. दरम्यान, पुन्हा एकदा त्यांचे एक वक्तव्य चर्चेत आले आहे. ते हडपसर हांडेवाडी रोड येथे श्रीरामाचा पूर्णाकृती मूर्तीच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते.

पुणे शहरात हडपसर हांडेवाडी रोड भर चौकात शिवसेना शहर अध्यक्ष प्रमोद भानगिरे यांच्या पुढाकारातून प्रभू श्रीरामाचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येत आहे, या शिल्पाचे भूमीपूजन माजी खासदार आढळराव पाटील शिवसेनेचे प्रतोद आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले.

हेही वाचा  –  पंतप्रधान मोदींवरील विश्वास अन्‌ विकास हेच भाजपाच्या विजयाचे सूत्र! 

भरत गोगावले नेमकं काय म्हणाले?

अजून मी मंत्री झालो नाही. परंतु, आता प्रभू श्री रामाचे भूमिपूजन माझ्या हस्ते झाले आहे. मला असे वाटते मी मंत्री होईल अशी अशा आहे. इथल्या महंमदवाडीचे आता महादेववाडी नामकरण ही होणार आहे. त्यामुळे हे महादेवा मला मंत्री करा. सर्व भक्तांनी माझ्यासाठी प्रार्थना करावी, असं भरत गोगावले म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button