‘भाई जगताप असा टपोरी ज्याला ‘भाई’ बनायचं होतं पण डरपोक…- निलेश राणे
मुंबई |
काँग्रेसचे नेते भाई जगताप हे सध्या बरेच चर्चेत आहेत. विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर केलेली टीका आणि त्यानंतर अमृता यांनी दिलेल्या उत्तरावरुन सध्या भाई जगताप हे चर्चेत आहेत. मात्र आता भाई जगताप यांच्याविरोधात भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांनी ट्विटरवरुन निशाणा साधला आहे. भाई जगताप हे टपोरी असल्याची टीका निलेश राणे यांनी केलीय.
भाई जगताप तो टपोरी आहे ज्याला ‘भाई‘ बनायचं होतं पण डरपोक असल्या मुळे त्या क्षेत्रात पण मागे राहिला. ज्या माणसाने स्वतःचं नाव ‘अशोक‘ बदलून ‘भाई‘ केलं असा माणूस काय लायकीचा आहे लक्षात येऊ शकतं.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) March 24, 2021
“भाई जगताप तो टपोरी आहे ज्याला ‘भाई‘ बनायचं होतं पण डरपोक असल्यामुळे त्या क्षेत्रात पण मागे राहिला. ज्या माणसाने स्वतःचं नाव ‘अशोक‘ बदलून ‘भाई‘ केलं असा माणूस काय लायकीचा आहे लक्षात येऊ शकतं,” असं ट्विट निलेश राणेंनी केलं आहे. भाई जगताप तो टपोरी आहे ज्याला ‘भाई‘ बनायचं होतं पण डरपोक असल्या मुळे त्या क्षेत्रात पण मागे राहिला. ज्या माणसाने स्वतःचं नाव ‘अशोक‘ बदलून ‘भाई‘ केलं असा माणूस काय लायकीचा आहे लक्षात येऊ शकतं.
वाचा- सर्वोच्च न्यायालयात लढाई! परमबीर सिंह यांच्या याचिकेवर आज सुनावणी