breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

ना अर्ज, ना कागदपत्रे; तरी लाडक्या बहिणीचा निधी भावाच्या खात्यात जमा

Ladki Bahin Yojana | मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यास सुरूवात झाली आहे. लाभार्थी महिलांच्या खात्यात दोन हप्त्यांचे तीन हजार रूपये जमा झाले आहेत. मात्र, यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथे ही रक्कम एका भावाच्या खात्यात जमा झाली आहे. विशेष म्हणजे, या भावाने त्याच्या बहिणीसाठी, पत्नीसाठी ना कोणता अर्ज केला होता, ना कोणती कागदपत्रे दिली होती. तरीही, त्याला योजनेचा लाभ मिळाल्याने योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटी बाहेर आल्या आहेत.

आर्णी येथील जाफर गफ्फार शेख या तरुणाच्या खात्यात हे पैसे जमा झाले आहेत. जाफर हे आर्णी शहरातील हाफीज बेग नगरातील रहिवासी आहेत. सुशिक्षित बेरोजगार असलेल्या जाफर शेख यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी कोणताही अर्ज भरला नव्हता आणि नियमानुसार त्यांना भरणे शक्यही नव्हते . तरीही त्यांच्या बँक ऑफ बडोदामधील खात्यात या योजनेचे तीन हजार रुपये शासनाने जमा केले आहे. जाफर यांना मोबाईलवर खात्यात तीन हजार रुपये जमा झाल्याचा संदेशही प्राप्त झाला. त्यानुसार जाफर यांनी तत्काळ बँकेत जाऊन आपले खाते तपासले असता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत त्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झाल्याचे, बँक स्टेटमेंटमधून स्पष्ट झाले.

हेही वाचा      –      ‘राज्यात सध्या तीन घाशीराम कोतवालांचं सरकार’; संजय राऊतांची टीका

यवतमाळ जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी चार लाख ६८ हजार अर्ज प्राप्त झाले. प्राप्त अर्जांची छाननी करून पात्र चार लाख ६० हजार अर्ज महिलांच्या खात्यात निधी वितरणासाठी शासनास पाठविण्यात आले होते. यापैकी अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहे. मात्र पुरुषांच्या खात्यात पैसे जमा होत असल्याने प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराचा विरोधकांनी खरपूस समाचार घेतला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button