breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘भाजपात गेल्यावर निवडून येऊ अशी मानसिकता’; बच्चू कडू यांचं विधान चर्चेत

मुंबई | लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. अशात राज्यातील काही बड्या नेत्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होऊ शकतो अशी चर्चा आहे. यावर प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख, आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय जनता पार्टीत गेलं की लवकर निवडून येता येते, काँग्रेसमध्ये निवडून येऊ शकत नाही. नाहीतर प्रहार आहेच, असं प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू म्हणाले आहेत.

आमदार बच्चू कडू म्हणाले की, मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील त्यांनी आमच्या लहान पक्षांसोबत चर्चा करावी. जेणेकरून आम्हाला कशा पद्धतीने समोर घेऊन जाणार आहात. जागा वाटपाबद्दल काय निर्णय होतो? हे सांगावे अन्यथा आम्ही आमचा स्वतंत्र्य निर्णय घेऊ. प्रमाणे लोकसभा भाजपला महत्त्वाची आहे, तशीच आम्हाला विधानसभा महत्त्वाची आहे. त्यामुळे महायुती मधील इतर लहान घटक पक्षांसोबत चर्चा करून आम्हाला कशा पद्धतीने समोर घेऊन जाणार आहात, जागा वाटपाबद्दल काय निर्णय होणार हे स्पष्ट करावं.

हेही वाचा      –      ..तर शाळा-कॉलेजची मान्यता रद्द होणार; विभागीय शिक्षण मंडळाचा थेट इशारा 

भारतीय जनता पार्टीत गेलं की लवकर निवडून येता येते, काँग्रेसमध्ये निवडून येऊ शकत नाही. नाहीतर प्रहार आहेच. हाती झेंडा घेतला म्हणजेच भाजपच होतो असं नाही. नवनीत राणा यांचं अंतर्मन भाजपचचं आहे. आधी नवनीत राणा या हिरवा, भगवा आणि निळा झेंडा घेऊन निवडणूक लढत होत्या. आता त्या भगवा झेंडा घेऊन निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. हिंदू शेरणी झाल्या आहेत. भाजप हे आता नवनीत आणि रवी राणा यांचा युवा स्वाभिमान पक्ष देखील संपवणार आहे. भाजपमध्ये जाऊन त्यांचा स्वाभिमान संपला नाही पाहिजे, असंही बच्चू कडू म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button