‘संभाजी भिंडेंचे ते विधान म्हणजे नालायकी’; आमदार बच्चू कडूंची सतप्त प्रतिक्रिया
![bacchu kadu said that Sambhaji Bhinde's statement is worthless](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/07/bacchu-kadu-and-sambhaji-bhide-780x470.jpg)
मुंबई : १५ ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्य दिवस नाही. याच दिवशी देशाची फाळणी झाली होती. त्यामुळे सर्वांनी या दिवशी उपवास करावा. या दिवशी दुखवटा पाळावा, असं वादग्रस्त विधान शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी काही दिवसांपुर्वी केलं होतं. संभाजी भिडे यांच्या त्या वक्तव्यानंतर राजकारण चांगलच तापलं आहे. या पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
आमदार बच्चू कडू म्हणाले की, असेच वक्तव्य जर एखाद्या परधर्मीयांना किंवा दुसऱ्या धर्मातल्या माणसानं केलं असतं तर आतापर्यंत लोकांनी तांडव केला असता. पण असे वक्तव्य भिडे यांनी केलं आहे. त्याचं हे वक्तव्य म्हणजे देशद्रोच आहे. तर असं वक्तव्य करणं हे नालायकी आहे.
हेही वाचा – Buldhana Accident : समृद्धी महामार्गावर बसचा भीषण अपघात, २५ जणांचा मृत्यू
संभाजी भिडे यांनी नेमकं काय म्हटलं आहे?
वंदे मातरम गीत तुमचं आमचं राष्ट्रगीत नाही, तर रवींद्रनाथ टागोर यांनी ‘जन गण मन’ हे गीत सुचलं. १५ ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्य दिवस नाही. याच दिवशी देशाची फाळणी झाली होती. त्यामुळे सर्वांनी या दिवशी उपवास करावा. या दिवशी दुखवटा पाळावा, असं संभाजी भिडे यांनी म्हटलं होतं.
छगन भुजबळ यांनी काय म्हटलं?
संभाजी भिडे खरे म्हणजेच मनोहर भिडे यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करायला पाहिजे. कारण त्यांनी सांगितलं की, १५ ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्य दिन नाही. आपला लोकप्रिय असलेला तिरंगा झेंडा हा आपला राष्ट्रध्वज नाही. जन गण मन हे आपलं राष्ट्रगीत नाही. परंतु असं वक्तव्य दुसऱ्या कोणी केलं असतं. तर त्याला आत्तापर्यंत देशद्रोहाच्या आरोपाखाली ताबडतोब अटक केली असती. मनोहर असलेलं नाव बदलून संभाजी असं नाव लावतात आणि बहुजन समाजाच्या पोरांना फितवायचं काम करतात, असं छगन भुजबळ म्हणाले.