गुहावाटीला जाण्यामुळे काय मिळाले? बच्चू कडू यांचा मोठा गौप्यस्फोट
![Bacchu kadu said that going to Guwahati gave us a lot of bad name in the state](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/08/bacchu-kadu-3-780x470.jpg)
मुंबई : शिवसेना आमदार यांच्यासोबत काही अपक्ष आमदाराही गुहावाटीला गेले होते. यामध्ये प्रहारचे आमदार बच्चू कडू हे देखील होते. या आमदारांवर सातत्याने ५० खोके घेतल्याचा आरोप होत आहे. मात्र गुहावाटीला गेलेले आमदार हा आरोप फेटाळत होते. दरम्यान, अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी गुहावाटीला जाऊन आपल्याला काय मिळाले याचा मोठा खुलासा केला आहे.
बच्चू कडू म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मी दहावेळा दिव्यांग मंत्रालय उभारा ही मागणी केली. राज्यमंत्री असूनही माझी मागणी पूर्ण झाली नाही. योगायोगाने गुवाहाटीला जाण्याचा योग आला. त्यावेळी देवेंद्र फडणीस यांनी फोन करून आपल्यासोबत यावं असे म्हटले. त्यावेळी मी तुमच्यासोबत येतो पण दिव्यांग मंत्रालय स्थापन करत असाल तरच येतो नाही तर तुमच्यासोबत येत नाही असे मी निक्षून सांगितले.
हेही वाचा – ‘अजित पवार आमचेच नेते, पक्षात फूट नाही’; शरद पवारांचे सूचक विधान
मी दुसऱ्यांदा गुवाहाटीला गेलो. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितले की तुम्हाला दिव्यांग मंत्रालय स्थापन करायचा शब्द पूर्ण करायला हवा. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट मुख्य सचिवांना फोन केला. त्यावेळी त्यांना कॅबिनेटची नोट बनवायली सांगितली. मुख्यमंत्री शिंदे यांच्यामुळेच दिव्यांग मंत्रालय मिळाले. गुवाहाटीला जाण्यामुळे आमची राज्यात खूप बदनामी झाली. पण त्याची पर्वा नाही. त्या बदनामीच्या बदल्यात आम्हाला दिव्यांग मंत्रालय मिळालं, असं बच्चू कडू म्हणाले.