शरद पवारांपुढे शकुनी मामा फेल; भाजप नेत्याची खोचक टीका
![Babanrao Lonikar said that Shakuni Mama failed before Sharad Pawar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/07/Sharad-Pawar-5-780x470.jpg)
पुणे | मराठा समाजाला सर्वात जास्त फसवणारा बेईमान नेता हे शरद पवार असल्याची टीका भाजप आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केली आहे. तसेच, शरद पवारांपुढे शकुनी मामा फेल असल्याचंही बबनराव लोणीकर म्हणाले. ते परतूर येथील भाजप कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.
बबनराव लोणीकर म्हणाले, मराठा समाजाला फसवणारा सर्वात मोठा बेमान नेता कोण असेल तर शरद पवार आहेत. त्याबद्दल कोणीच काही बोलत नाही. शरद पवार यांच्यासमोर शकुनी मामाही फेल आहे. शरद पवार जिवंत आहेत ना..? काय हाल आहेत..! एका हाताने करायचे आणि एका हाताने फेडायचे. आपल्या सरकारने मराठा आरक्षण दिलं. त्याची अंमलबजावणी सुरू झाली. मराठा आरक्षणाचा फायदा मुलांना शिक्षणात होऊ लागला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या पांढऱ्या पायाच्या सरकारमुळे आरक्षण गेले.
हेही वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पंढरपूरमध्ये विठुरायाची महापूजा
सुप्रीम कोर्टात जेव्हा आरक्षणाची केस होती त्यावेळेस आघाडी सरकारने कपिल सिब्बल वकील दिला. अतिरेक्यांचा जामीन घेणारा, राम मंदिराला विरोध करणारा वकील दिला आणि त्यांनी आरक्षण घालवले. वकील कोणी दिला..? उद्धव ठाकरेंची आणि त्यांची ओळख होती का..? वकील शरद पवार यांनी दिला आणि कपिल सिब्बलमुळे मराठा आरक्षण गेले, असा दावा करतानाच ओबीसींचे ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद अध्यक्ष हे होत होते. परंतु ओबीसींचे आरक्षणही आरक्षण शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमुळे गेले, असं लोणीकर म्हणाले.
काँग्रेसवाले बेईमान आहेत, राष्ट्रवादीवाले हरामखोर आहेत. हे साले शिवसेनावाले बेबनाव करत आहेत. या लोकांच्या बहकाव्यात येऊ नका. हे लोक ओबीसी आणि मराठा भांडण लावत आहेत, असं सांगतानाच मोदीजी सबका साथ, सबका विकास करत आहेत. देशाच्या पंतप्रधानाबद्दल स्वाभिमान बाळगा, असंही बबनराव लोणीकर म्हणाले.