कसबा पेठ तेरावी फेरी अखेरीस रवींद्र धंगेकर ५०८६ मतांनी आघाडीवर
पुणे : पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. सकाळी ८ पासून मतमोजणीला सुरूवात झाली आहे. सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही बाजूंनी ही निवडणूक विशेष प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे आजच्या निकालाकडे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलं आहे.
तेरावी फेरी अखेरीस रवींद्र धंगेकर ५०८६ मतांनी आघाडीवर
कसबा पेठ तेरावी फेरी अखेरीस रवींद्र धंगेकर ४९९१२० मतं मिळाली आहेत. यासह धंगेकर ५०८६ मतांनी आघाडीवर आहेत. तर हेमंत रासने ४४०३४ आणि आनंद दवे १२१ मते मिळाली आहेत.
कसबा पेठ बारावी फेरी अखेरीस रवींद्र धंगेकर ४५६३८ मतं मिळाली आहेत. यासह धंगेकर ५००० मतांनी आघाडीवर आहेत. तर हेमंत रासने ४०७६१ आणि आनंद दवे १२१ मते मिळाली आहेत.
उमेदवारी मिळाली, त्याच दिवशी माझा विजय निश्चित झाला – रवींद्र धंगेकर
मला उमेदवारी मिळाली, त्याच दिवशी माझा विजय निश्चित झाला होता. प्रचार वगैरे औपचारिकता मला करावी लागली. मी सर्व जातीधर्माच्या भिंती तोडून काम केलं आहे. मी कधीच आलेल्या माणसाचं नाव, त्याचा पत्ता विचारलेला नाही. माझा १५ हजार मतांनी विजय होईल, असं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं आहे.