पुण्यात तिसऱ्या फेरीअखेर मुरलीधर मोहोळ १२ हजार ६०० मतांनी आघाडीवर
![At the end of the third round in Pune, Muralidhar Mohol is leading by 12 thousand 600 votes](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/Murlidhar-Mohol--780x470.jpg)
Lok Sabha Election Results 2024 | देशातील लोकसभा निवडणुकीचा आज मतमोजणी सुरु झाली आहे. पुणे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात भाजपाचे उमेवादर मुरलीधर मोहोळ विरुद्ध काँग्रेसचे कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकरचे विरुद्ध वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे विरुद्ध ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (एमआयएम) अनिस सुंडके अशी चौरंगी लढत पुण्यात बघायल मिळाली होती.
पुण्यात तिसऱ्या फेरीअखेर मुरलीधर मोहोळ १२ हजार ६०० मतांनी आघाडीवर आहेत. तर दुसऱ्या फेरीअखेर वसंत मोरे यांनी १ हजार मत मिळाली आहेत.
हेही वाचा – आढळराव पाटलांना मोठा धक्का! शिरूरमध्ये अमोल कोल्हे १८ हजार ६७४ मतांनी आघाडीवर
विधानसभा मतदारसंघनिहाय २०२४ मध्ये झालेले मतदान
विधानसभा – पुरुष – महिला – एकूण – टक्केवारी
वडगावशेरी – १,३२,०७० – १,०९,७१८ – २,४१,८१७ – ५१.७१
शिवाजीनगर – ७३,७९५ – ६७,३२३ – १,४१,१३३ – ५०.६७
कोथरूड – १,१४,४५१ – १,०३,००० – २,१७,४५५ – ५२.४३
पर्वती – ९९,२९८ – ८९,८७१ – १,८९,१८४ – ५५.४७
कॅन्टोन्मेंट – ७८,८२४ – ७१,१४९ – १,४९,९८४ – ५३.१३
कसबा – ८६,०७३ – ७८,०१७ – १,६४,१०५ – ५९.२४
एकूण – ५,८४,५११ – ५,१९,०७८ – ११,०३,६७८ – ५३.५४