breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

सुलभा उबाळे, धनंजय आल्हाट यांच्याकडून विधानसभेचे रणशिंग!

भाजपा आमदार महेश लांडगे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका

विधानसभा निवडणुकीची ठाकरे गटाकडून मोर्चेबांधणी

पिंपरी | ‘ना भय, ना भ्रष्टाचार’ अशी वल्गना करणा-या भारतीय जनता पक्षाच्या 2017 ते 2022 या राजवटीत महापालिकेत प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे. आताही प्रशासकीय राजवटीत महापालिकेचे अधिकारी भाजप आमदाराच्या दबावाखाली काम करत असून भोसरीतील प्रत्येक काम आमदारांच्या म्हणण्याप्रमाणेच होते. याला विधानसभा निवडणुकीत जनता उत्तर देईल, असा घणाघात शिवसेना ठाकरे गटाच्या तीव्र इच्छुक नेत्या सुलभा उबाळे यांनी केला आहे.

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या भाेसरी विधानसभा मतदार संघातील पदाधिका-यांनी आज (बुधवारी) पत्रकार परिषद घेतली. चिंचवड येथे झालेल्या पत्रकार परिषदेला जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, शहर संघटक तुषार सहाणे, अजिंक्य उबाळे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी सगळीकडे हप्तेबाजी आणि दमदाटी करून दडपशाही सुरू असल्याचा आरोप केला आहे. तसेच, पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी विधानसभा मतदार संघातील हायुतीच्या विद्यमान आमदार महेश लांडगे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. त्यामुळे या मतदार संघातून ठाकरे गटाचा उमेदवार असेल आणि उबाळे किंवा आल्हाट यांच्यापैकी एक उमेदवार असतील, यावर अप्रत्यक्ष शिक्कामोर्तब केले आहे.

हेही वाचा     –      सभोवती घडणाऱ्या गोष्टीची माहिती न घाबरता पोलीसांना द्या; पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे नागरिकांना आवाहन 

शहरात प्रथमच उद्धव ठाकरे गटाकडून घेतलेली पत्रकार परिषद मुद्देसुद आणि तांत्रिकदृष्टया अचूक पहायला मिळाली. राजकीय विरोधक, प्रशासन हा एकप्रकारे गर्भीत इशारा ठरला आहे.

भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट म्हणाले, महापालिकेत नगरसेवक नसल्याने प्रशासन आणि जनतेमध्ये माेठे अंतर पडले आहे. भाजप आमदाराच्या दबावाखाली प्रशासन कामकाज करत आहे. इंद्रायणी नदी पात्र जलपर्णी आणि फेसाने व्यापले असून नदीची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. जलपर्णी काढण्यासाठी दरवर्षी महापालिका काेट्यवधी रूपयांच खर्च करते. मात्र, ठेकेदार पावसाची वाट बघत जलपर्णी काढत नसल्याचा आराेपही त्यांनी केला. तसेच, तळवडे ते चऱ्होली इंद्रायणी नदी पात्रामध्ये नदी सुधार प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात केलेल्या ‘इंटरसेप्टर सीवर लाईन’ यावर जोरदार आक्षेप घेतला.

पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करा…

स्मार्ट सिटीतील भ्रष्टाचाराबाबत पुराव्यानिशी तक्रार केली. मात्र, त्यावर काहीच झाले नाही. चिखली येथे उभारण्यात आलेला एसटीपी प्लॅन्ट बंद असून दुषित पाणी थेट इंद्रायणी नदीत साेडले जात आहे. हेच पाणी लाखाे वारकरी तीर्थ म्हणून प्राशन करतात. मात्र प्रशासनाला आणि लाेकप्रतिनिधींना लाजा वाटत नाही. नदी पात्रात प्लाॅटिंग करून त्याची विक्री करून सर्वसामान्य नागरिकांची लूट सुरू असल्याचा आराेपही उबाळे यांनी केला. विशेष म्हणजे, ‘रिव्हर सायक्लोथॉन’वर आमदार महेश लांडगे यांच्या उपक्रमावरही उबाळे यांनी खरमरीत टीका केली. तसेच, महापालिका पर्यावरण विभागाचे सहशहर अभियंता संजय कुलकर्णी यांच्या संपत्तीची चौकशी करावी आणि अन्य ठिकाणी बदली करावी, अशी मागणीही उबाळे यांनी केली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button