‘बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही आरक्षणाची मर्यादा वाढवा’; अशोक चव्हाण यांची मागणी
![Ashok Chavan said that the limit of reservation should be increased in Maharashtra as in Bihar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/11/Ashok-Chavan-780x470.jpg)
मुंबई : बिहार विधानसभेने आरक्षणाची मर्यादा ७५ टक्के करण्याबाबतचे विधेयक मंजूर केले आहे. यावरून, काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राज्य सरकारकडे मोठी मागणी केली आहे. बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही आरक्षणाची मर्यादा वाढवा, असं अशोक चव्हाण म्हणाले.
अशोक चव्हाण नेमकं काय म्हणाले?
बिहार विधानसभेने आरक्षणाची मर्यादा ७५ टक्के करण्याबाबतचे विधेयक मंजूर केले आहे. विशेष म्हणजे या विधेयकाला भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनीही पाठिंबा दिला. जे बिहारमध्ये शक्य आहे, ते महाराष्ट्रात का नाही?
हेही वाचा – मनसेच्या ‘दीपोत्सव’ कार्यक्रमावरून भाजपा नेत्याचा राज ठाकरेंना खोचक टोला; म्हणाले..
बिहार विधानसभेने आरक्षणाची मर्यादा ७५ टक्के करण्याबाबतचे विधेयक मंजूर केले आहे. विशेष म्हणजे या विधेयकाला भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनीही पाठिंबा दिला.
जे बिहारमध्ये शक्य आहे ते महाराष्ट्रात का नाही?
राज्य विधीमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनात महायुती सरकारने महाराष्ट्रातही…— Ashok Chavan (@AshokChavanINC) November 10, 2023
राज्य विधीमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनात महायुती सरकारने महाराष्ट्रातही आरक्षण मर्यादा शिथिल करण्याबाबत पावले उचलावीत; जेणेकरून मराठा आरक्षणाचा मार्ग सुकर होऊ शकेल, असं अशोक चव्हाण म्हणाले.
देशात जातीय जनगणना करावी आणि आरक्षणाची मर्यादा शिथिल करावी, अशी भूमिका काँग्रेस पक्षाने अगोदरच घेतली आहे. हैदराबाद आणि नवी दिल्ली येथे झालेल्या काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत तसे ठरावही मंजूर करण्यात आले आहेत, असंही अशोक चव्हाण म्हणाले.