‘तुला निपटून टाकू’ अशी भाषा जरांगेंनी फडणवीसांबाबत वापरली; आशिष शेलारांचा हल्लाबोल
![Ashish Shelar said that Jarang used language about Fadnavis to get rid of you](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/02/Ashish-Shelar-780x470.jpg)
मुंबई | राज्य विधिमंडळात आज मराठा आरक्षण आणि मनोज जरांगेंनी केलेल्या आरोपांवरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. भाजप आमदार आशिष शेलार यांनी हा मुद्दा उपस्थित केला. यावेळी सभागृहात त्यांनी मनोज जरांगे यांच्या मागे कोण आहे? हा प्रश्न उपस्थित केला. तसेच या संपुर्ण प्रकरणाची एसआयटी चौकशी करावी अशी मागणीही केली.
आशिष शेलार म्हणाले की, महाराष्ट्राला बेचिराख करण्याची भूमिका घेतली जात असेल तर विरोधी पक्ष आमच्यासोबत असेल. संपवून टाकू, निपटून टाकू, बोलण्याची हिंमत जरांगेंमध्ये कशी आली. आधी भुजबळ, मग उपमुख्यमंत्री आता मुख्यमंत्र्यांना धमकी जरांगे यांच्या मागे कोण आहे? ते समोर येण्यासाठी एसआयटी चौकशीची मागणी आशिष शेलार यांनी केली.
हेही वाचा – अॅट्रोसिटी कायद्याचा साईड बिजनेस, रॅकेट चालू; केतकी चितळेचं स्फोटक व्यक्तव्य
मनोज जरांगे यांच्या सुरुवातीपासून एक, एक मागण्या मान्य केल्या. त्या आपण मान्य केल्या. परंतु आता जरांगे यांची भाषा बदलली. आता ते महाराष्ट्र बेचिराख करण्याबाबत बोलू लागले. आपण हा डाव उधळल्याचे त्यांनी म्हटले. मग महाराष्ट्र बेचिराख करण्याची योजना कोणाची होती? याची एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली, असं आशिष शेलार म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत एकरी उल्लेख केला गेला. आतापर्यंत कुठेही फडणवीस यांचे वात्रट भाषण झाले नाही. त्यांनी कायदा आणि संविधाननुसार भाषण केले आहे. त्यावर आता जरांगे म्हणतात, तुला निपटून टाकू. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालय म्हणतो तुम्ही गांभीर्याने घ्या. शांत बसू नका. मराठा समाजाच्या पाठिशी आम्ही आहोत. परंतु ही भाषा करण्याची हिंमत आली कोठून, असंही आशिष शेलार म्हणाले.