‘अजित पवारांना अडचणीत आणत, सरकारमधून काढण्याचा कट’; भाजप नेत्याचा मोठा दावा
![Ashish Deshmukh said that there is a conspiracy to remove Ajit Pawar from the government](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/09/ajit-pawar-1-780x470.jpg)
मुंबई : जालन्यात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनात पोलिसांनी लाठीमार केला. याचे पडसाद संपुर्ण राज्यभर उमटत आहेत. तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आशिष देशमुख यांनी मोठा दावा केला आहे.
आशिष देशमुख म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण पाहिजे, पण त्यांना OBC मधून नव्हे तर वेगळे आरक्षण दिले पाहिजे. ओबीसीची टक्केवारी कमी होता कामा नये, यासाठी एकटे वडेट्टीवारच नाही, आम्ही सर्व OBC नेते त्यांच्यासोबत उभे आहोत. पण मराठा समाजाला पण आरक्षण देण्यात यावे, कारण की त्यांना पण गरज आहे. मराठा समाज फडणवीसांवर विश्वास ठेवतो. जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होते, तेव्हा मराठा समाजाला आरक्षण मिळाले होते आणि महाविकास आघाडीच्या सरकारने ही केस व्यवस्थित हाताळली नाही म्हणून सुप्रिय कोर्टात ती टिकू शकले नाही.
हेही वाचा – ‘त्या’ बांधकाम व्यावसायिकांवर फौजदारी गुन्हा दाखल करा!
गृहमंत्री असताना अनिल देशमुख यांना, अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके कोणी आणले, सचिन वझे, हा वसुली करतो हे त्यांना कळलं नाही, त्याचे अधिकारी सिरियसली घ्यायचे नाही मग आता ते गृहमंत्री नसताना त्यांना कसं कळलं? हे सर्व कटकारस्थान शरद पवार यांच्याकडूनच केले जात आहे. अनिल देशमुख यांची नार्को टेस्ट करा, सत्य सर्व समोर येईल, अशी मागणी आशिष देशमुख यांनी केली.