ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

पिंपरी-चिंचवड : शिवमहापुराण कथा सोहळ्याची उत्कंठा शिगेला!

पंडित प्रदीप मिश्रा यांचे पिंपरी-चिंचवडमध्ये आगमन

सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर जय्यत तयारी

पिंपरी । प्रतिनिधी

महाराष्ट्रामध्ये प्रथमच पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा विनामूल्य श्री अष्ठविनायक शिवमहापुराण कथा वाचन सोहळा पिंपरी-चिंचवडमध्ये होत आहे. त्यामुळे तमाम शिवभक्तांची उत्कंठा शिगेला पोहोचली असून, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिवकथा वाचक पंडित प्रदिप मिश्रा यांचे शहरात आगमन झाले. शहरवासीयांच्या वतीने त्यांचे भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी स्वागत केले.

पिंपरी-चिंचवड शहरातील लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप मित्र परिवार च्यावतीने श्री अष्टविनायक शिवमहापुराण कथेचे आयोजन दि. १५ ते २१ सप्टेंबर २०२३ दरम्यान दुपारी २ ते ५ या वेळेत पीडब्ल्यूडी मैदान, नवी सांगवी येथे केले आहे. परमपूज्य पंडित प्रदिप मिश्रा यांच्या सुश्राव्य वाणीतून हा अभूतपूर्व अध्यात्मिक सोहळा रंगणार आहे. हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा शिव पुराण कथा मोफत वाचन सोहळा आहे.

मध्यप्रदेश येथील प. पु. पंडित प्रदीप मिश्रा यांच्या अमोघ वाणीतून ही कथा ऐकण्याची संधी पिंपरी-चिंचवडवासीयांना मिळणार आहे. पंडित मिश्रा यांचे लाखो अनुयायी कथेचे श्रवण करण्यासाठी येणार आहेत. या दिवसांमध्ये सुमारे आठ ते नऊ लाख श्रोते या कथेचे श्रवण करतील. त्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता भव्य मंडप व संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी श्री शिव महापुराण कथा आयोजन समिती गठीत केली आहे. त्यामध्ये २५ उपसमिती आहेत.

हेही वाचा – आमदार अपात्रता प्रकरण सुनावणी, नेमकं काय घडलं विधानभवनात?

भाविकांच्या सुरक्षेची काळजी…

कार्यक्रमासाठी आलेल्या भाविकांसाठी प्रशस्त व्यवस्था केली आहे. पार्किंग, सुसज्ज बैठक व्यवस्था, स्वच्छतागृह, रुग्णवाहिका, प्रथमोपचार सुविधा, जेवन, नाष्टा, शुद्ध पिण्याचे पाणी, अग्निशमन यंत्रणा, स्वच्छता नियोजन, सुरक्षा, पोलीस बंदोबस्त, भाविकांची निवास व्यवस्था, आपतकालीन व्यवस्था अशी जय्यत तयारी केली आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून शिवभक्त या कथा वाचन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. भाविकांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात आली आहे. कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह सर्व प्रशासकीय अधिकारी, सर्व समाजातील धर्मगुरू, सामाजिक कार्यकर्ते, खेळाडू आदींना निमंत्रित करण्यात आले आहे.

तब्बल १२ एकर मैदानावर व्यवस्था…

सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावरील तब्बल १२ एकर परिसरात या अध्यात्मिक सोहळ्याचे आयोजन केले आहे. आगामी सात दिवसात भाविकांचा मोठा राबता असणार आहे. यासाठी सुसज्ज असा सभामंडप बांधला असून यामध्ये सुमारे १ लाख भाविक एका वेळी बसून कथा ऐकू शकतील, अशी व्यवस्था आहे. सुमारे ५ ते १० हजार भाविकांचे ‘एक ब्रॅकेट्स’ अशी बैठक व्यवस्था आहे. यामुळे भाविकांची एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही. तसेच अँब्युलन्स थेट मंचापर्यंत जावू शकेल अशा प्रकारे मंडपाची बांधणी केली आहे.

पिंपरी-चिंचवडसह पश्चिम महाराष्ट्रातील शिवभक्तांसाठी हा अलौकिक असा भक्ती-शक्तीचा महिमा आणि शिवपुराणाचे ज्ञान देणारा अध्यात्मिक सोहळा आहे. श्री अष्टविनायक शिव महापुराण कथा वाचनासाठी सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानात संपूर्ण तयारी झाली आहे. भाविक-भक्तांनी आणि साधकांनी या मोफत कार्यक्रमाला आवर्जुन उपस्थित रहावे. लोकनेते लक्ष्मण जगताप मित्र परिवार यांच्या पुढाकाराने होणारा या धार्मिक कार्यक्रमासाठी सर्व जाती-धर्मांच्या मान्यवर, नागरिकांना आम्ही निमंत्रित केले आहे.

शंकर जगताप, शहराध्यक्ष, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button