breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

पुणे जिल्ह्यात अजित पवारांचाच ‘होल्ड’; ‘पीएमआरडीए’ आयुक्तपदी निकटवर्ती योगेश म्हसे यांची नियुक्ती

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय मोर्चेबांधणी

पुणे जिल्ह्यातील प्रस्तावित कामांना गती देण्यासाठी ‘मास्टर प्लॅन’

पुणे | विशेष प्रतिनिधी

राज्यात आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर असताना पुणे जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ‘होल्ड’ कायम आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह ‘पीएमआरडी’च्या अंतर्गत प्रलंबित कामांना गती देण्यासाठी ‘मास्टर प्लॅन’ केला आहे. त्यामुळे निवडणुकीत मतदारांसमोर ‘डेव्हलपमेंट ॲन्ड डेडिकेशन’ असा अजेंडा ठेवण्यात आला आहे.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) च्या आयुक्तपदी राहुल महिवाल यांच्याजागी योगेश म्हसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए ) आयुक्त पदी योगेश म्हसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज (२७ जून) ही नियुक्ती करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव (सेवा) नितीन गद्रे यांनी योगेश म्हसे यांच्या नियुक्तीबाबतचे पत्र जारी केले आहे.

हेही वाचा      –      १ जुलैपूर्वी ‘या’ गोष्टी करा अन्यथा नंतर होईल पश्चाताप 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मर्जीतील अधिकारी म्हणून सनदी अधिकारी योगेश म्हसे यांची ओळख आहे. पुण्यात त्यांची नियुक्ती करुन पुणे, पिंपरी-चिंचवडसह पीएमआरडीए हद्दीतील प्रलंबित विकासकामे आणि प्रकल्पांना चालना देण्याची भूमिका घेण्यात येणार आहे. त्याद्वारे आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे पुणे जिल्ह्यातील वर्चस्व कामय ठेवण्याचा संकल्प आहे.

जिल्ह्यातील १५ जागा राष्ट्रवादी लढवणार?

पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाची मोठी ताकद आहे. पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील १५ जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुतीच्या माध्यमातून लढण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणेवर ‘अंकूश’ ठेवण्याची रणनिती आहे. विकास, सामाजिक सलोखा आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षांची पूर्तता अशा मुद्यांवर ही निवडणूक लढण्याचा महायुतीचा मानस आहे. पुणे जिल्हा राष्ट्रवादीचे बलस्थान असून, हा बालेकिल्ला मजबूत ठेवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ताकदीने कामाला सुरूवात केली आहे.

पिंपरी-चिंचवडमधील २ जागांवर दावा..

पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मोठे योगदान आहे. पिंपरी-चिंचवडमधील पिंपरी आणि भोसरी या दोन मतदार संघांवर राष्ट्रवादीने दावा केला आहे. तसेच, पुण्यातही ८ पैकी ४ मतदार संघात पक्षाकडे ‘विनिंग कॅन्डिडेट’ आहेत. पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका अधिकार क्षेत्र पीएमआरडीएच्या अधिकारात येते. त्यामुळे या दोन्ही शहरांची संबंधित अनेक प्रश्न मार्गी लावता यावेत. रिंगरोड, नदी सुधार प्रकल्प, विकास आराखडा यासह ग्रामीण भागातील विविध विकास प्रकल्प मार्गी लावता यावेत. या करिता पीएमआरडीएचे नवनिर्वाचित आयुक्त योगेश म्हसे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीला बळ मिळेल, असा दावा केला जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button