राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा, मुंबईत होणार समारोप
![Announcement of the second leg of Rahul Gandhi's Bharat Jodo Yatra](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/12/Rahul-Gandhi-1-1-780x470.jpg)
मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता काँग्रेस भारत न्याय यात्रेला सुरूवात करणार आहे. ही पदयात्रा ईशान्येतील मणिपूरपासून सुरू होऊन देशाच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे मुंबईत जाणार आहे.या प्रवासात काँग्रेस ६२०० किलोमीटरचं अंतर पार करणार आहे.
काँग्रेसचे प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे १४ जानेवारीला मणिपूरमधून या यात्रेला सुरुवात करतील. ही यात्रा २० मार्चला मुंबईत संपणार आहे. राहुल गांधींच्या भारत न्याय यात्रेत १४ राज्यांमधील तब्बल ८५ जिल्ह्यांचा समावेश केला जाणार आहे. हा मोर्चा मणिपूर, नागालँड, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रात असा ६ हजार २०० किलोमीटरचा प्रवास करेल. भारत जोडो यात्रेने ४ हजार ५०० किलोमीटर प्रवास केला होता.
हेही वाचा – आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी इम्तियाज जलील यांचा मनोज जरांगेंना सल्ला; म्हणाले..
🇮🇳 𝗕𝗛𝗔𝗥𝗔𝗧 𝗡𝗬𝗔𝗬 𝗬𝗔𝗧𝗥𝗔 🇮🇳
🗓️ 14th January to 20th March📍From Manipur to Mumbai
🛣️ 6200 kms
🚌 14 states & 85 districts 🚌 pic.twitter.com/rp6IqoQ5QB
— Congress (@INCIndia) December 27, 2023
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांना या यात्रेचं नाव न्याय यात्रा का ठेवलं? असं विचारलं तेव्हा ते म्हणाले की, आम्ही जनतेला आर्थिक, सामाजिक आणि धोरणात्मक न्याय देऊ, असं आश्वासन देऊ इच्छितो. पहिली यात्रा १२ राज्यांतून गेली, तर दुसरी यात्रा १४ राज्यांतून जाणार आहे.