Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘भाजपसोबत जाण्यासाठी मुश्रीफ माझ्या घरी पाच तास बसले होते’; अनिल देशमुखांचं विधान चर्चेत

मुंबई : अजित पवार गट आणि शरद पवार गटांत गेल्या दोन दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अनिल देशमुखांना मंत्रीपद न मिळाल्याने ते आमच्याबरोबर आले नाहीत, असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. अजित पवारांनी केलेल्या विधानावर अनिल देशमुख यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

अनिल देशमुख म्हणाले, भाजपानं मला खोट्या प्रकरणात फसवलं होतं. त्यामुळे त्यांच्यासोबत जाण्याचा प्रश्नच नव्हता. मला पाहिजे, ते खातं देण्याची त्यांची तयारी होती. तसेच, भाजपाबरोबर जाण्यासाठी हसन मुश्रीफ माझ्या घरी पाच तास बसले होते. पण, मला त्रास देणाऱ्यांबरोबर मी कुठल्याही परिस्थितीत जाणार नव्हतो. तसेच, मी शरद पवारांची साथ सोडणार नव्हतो.

हेही वाचा  –  मराठी पाट्यांच्या मुद्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट

अजित पवार नेमकं काय म्हणाले?

अनिल देशमुख माझ्याबरोबर सर्व बैठकांना उपस्थित होते. मला मंत्रीमंडळात स्थान मिळालं पाहिजे, असं देशमुखांनी म्हटलं होतं. पण, भाजपाकडून सांगण्यात आलं की, आम्ही देशमुखांवर सभागृहात आरोप केले आहेत. लगेच मंत्रीमंडळात त्यांना स्थान दिलं, तर आमच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण होईल, त्यामुळे अनिल देशमुखांना घेता येणार नाही. मग, मंत्रीपदाच्या यादीतून देशमुखांचं नाव वगळलं गेलं. त्यावर देशमुखांनी सांगितलं, मला मंत्रीपद नाही तर मी तुमच्याबरोबर येणार नाही. ही काळ्या दगडावरील पांढरी रेघ आहे, असं अजित पवार म्हणाले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button