breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची ईडीकडून 26 कोटींची संपत्ती जप्त

पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील २६ कोटी ६० लाख रुपयांची मालमत्ता जप्त

पुणे : शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अनिल भोसले यांची २६ कोटी ६० लाख रुपयांची मालमत्ता सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) ने जप्त केली आहे.

शिवाजीराव भोसले बँकेतील ठेवीदारांची ७१ कोटी रुपयांची फसवणूक तत्कालीन संचालकांनी केली होती. या प्रकरणी पुणे येथील शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयाने माजी आमदार अनिल भोसले यांच्या मालमत्तेवर टाच आणली होती. आता ईडीनेही अनिल भोसले यांची पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील मिळून २६ कोटी ६० लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

या प्रकरणामध्ये अनिल भोसले यांना मागील वर्षी मार्च महिन्यात अटक झाली होती. तर शिवाजीराव बँक भोसले बँक गैरव्यवहार प्रकरणात बँकेचे संचालक अनिल शिवाजीराव भोसले, सूर्याजी पांडुरंग जाधव, नूसर शनूर मुजावर यांच्यासह अन्य आरोपींच्या विरोधात पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने कारवाई केली होती.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button