येलमार समाज प्रतिष्ठाणच्या अध्यक्षपदी अमोल माडगूळकर
सचिवपदी अमोल येलमार, कार्याध्यक्षपदी भाऊसाहेब कंडरे तर उपाध्यक्षपदी शशिकांत येलपले
![Yelmar Society, Establishment, Amol Madgulkar as President,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/07/Yalman-Society-780x470.png)
पुणे : येलमार समाज प्रतिष्ठाणची कार्यकारणी जाहीर करण्यात आलेली असून अध्यक्षपदी अमोल माडगूळकर यांची सचिवपदी अमोल येलमार यांची निवड करण्यात आलेली आहे. तर कार्याध्यक्षपदी भाऊसाहेब कंडरे यांची निवड झाली आहे. अध्यक्ष, सल्लागार आणि पदाधिकारी यांनी संपूर्ण कार्यकारणीला शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी ज्येष्ठ नेते रंगनाथ बळवंत येलमार, सल्लागार, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त गणपत माडगूळकर, प्रतिष्ठाणचे मा. संग्राम पाटील, डॉ. श्रीधर येलमार, बाळासाहेब लोकरे, प्रवीण चौगुले, ऍड. श्रीधर येलमार, योगेश विभुते उपस्थित होते.
नवीन कार्यकारणी पुढील प्रमाणे : अध्यक्ष, अमोल भालचंद्र माडगूळकर, कार्याध्यक्ष भाऊसाहेब कृष्णा कंडरे, उपाध्यक्ष शशिकांत येलपले, प्रदीप विठ्ठलराव पाटील, भीमराव पांडुरंग होळकर, सचिव अमोल विष्णू येलमार, सह सचिव चंद्रकांत शिवाजी चौगुले, खजिनदारसुभाष पांडुरंग येलमार, संचालक चंद्रशेखर गणपत कोळवले, गंगाराम गणपत विभुते, बाळासाहेब दादा येलमार, राजाराम हरिदास विभुते, संजय राजाराम रणखांबे, लक्ष्मण बाबुराव येलपले, दत्तात्रय भगवान कोळवले, डॉ. धीरज मधुकर तोंडले, अमोल राजाराम यलमर, पांडुरंग महादेव येलमार, गणेश महादेव येलपले, राजेंद्र दशरथ कंडरे, गोविंद विभुते, विद्या ज्ञानेश्वर येलमार, ललिता सावळाराम कोळवले, मंगल राजाराम विभुते.
समाजाच्या हितासाठी आणि सर्व घटकांसाठी नवीन कार्यकारणी प्रयत्न करणार आहे. समाज शैक्षणिक, आर्थिक प्रगतिशील होण्यासाठी व्यवसायात नवीन तरुणांनी येण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.